राहुरी - विशेष वृत्त
राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ सर्व कार्यक्रमांचे आयोजन करते , मात्र कृषी विद्यापीठाला 56 वर्षे पूर्ण झाल्याने याचा विद्यापीठाला विसर पडला काय ? अशी चर्चा सुरू आहे .
29 मार्च 1968 या वर्षी दहा जिल्ह्यांचा विस्तार असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना राहुरी येथे झाली . नगर , कोल्हापूर , सांगली , सातारा , नंदुरबार , धुळे , जळगाव आदी दहा जिल्ह्यात विस्तार असणाऱ्या या कृषी विद्यापीठांतरत शिक्षण , संशोधन , विस्तार याला अग्रक्रम देण्यात आलेला आहे .
विद्यापीठाचे कुलगुरू हे उपराज्यपाल पदाची असतात . गेल्या काही वर्षांपासून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ मुख्यालय असलेल्या विद्यापीठात वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे व प्रश्नांमुळे कायम असलेल्या विद्यापीठाचा गुणांक कमी झालेला असल्याचे बोलले जात आहे . कृषी विद्यापीठांतर्गत अनेक ठिकाणी अवैध बेकायदेशीर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वेगवेगळ्या गोष्टी , प्रकार व घटना घडत आहेत. त्याला वरिष्ठ पातळीवर काही लोक पाठीशी घातले जात असल्याचेही बोलले जात आहे . वेगवेगळी अतिक्रमणे , ब्लॅकमेलिंग , दबाव तंत्र आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कार्यप्रणालीवर शेतकरी , प्रकल्पग्रस्त आणि विद्यापीठाला भेट देण्यासाठी येणारे विद्यापीठाकडे पाहून शंका उपस्थित करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे . या अनुषंगाने विद्यापीठाला 56 वर्ष पूर्ण झालेत . मात्र याचा सर्वांनाच विसर पडला की काय ? असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळातून विचारायला जात आहे .
Post a Comment
0 Comments