राहुरी - विशेष वृत्त
कोणतीही प्रसिद्धी , निविदा , जाहीर प्रकटन न करताच राहुरी महसूल विभागाने जप्त केलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांचा लिलाव मंगळवार 5 मार्च रोजी राहुरी ठेवला आहे . गेल्यावर्षभरामध्ये राहुरीत 3 तहसीलदार बदलून आल्याने महसूल विभागाच्या कामकाजात प्रचंड अनियमितता आलेली आहे .
सध्या नव्याने पाटील तहसीलदार म्हणून रुजू झाले आहेत , मात्र गौण खनिज विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी आहे तेच आहेत .
गेल्या काही काळामध्ये जप्त केलेल्या अवैध वाळू वाहतुकीच्या वाहनांच्या लिलावाबाबत तक्रारी व अन्य बाबी झाल्यानंतर जप्तीचे लिलाव वादग्रस्त झाले होते .
या पार्श्वभूमीवर येत्या पाच मार्च रोजी जप्त केल्या वाहनांचे अशा पद्धतीने जाहीर प्रकटन न करताच होत असल्याने महसूल विभागाच्या वर्तुळात याविषयी संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे .
गेल्या दोन वर्षांपासून महसूल विभागाची वसुली शंभर टक्क्यांपर्यंत जाण्यासाठी महसूल विभागाची नाकी नऊ येत असून आता हे वाहनांचे जप्तीची लिलाव होत आहे.
दरम्यान , राहुरी तालुक्यातील चाळुचोरी विरोधी पथकांनी मुळा, प्रवरा नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करत असताना जप्त केलेल्या वाहन मालकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत केले आहेत.
वाहन मालकांनी दंडात्मक रक्कम शासन जमा न केल्याने अशा वाहनांचा लिलाव 5 मार्च, 2024 रोजी सकाळी 11-00 वाजता तहसिल कार्यालय, राहुरी येथे करण्यात येणार आहे. जप्त केलेल्या वाहनांच्या विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी वाहनमालकांनी दंडाची रक्कम शासन जमा करावी. अन्यथा जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. तसेच लिलावाच्या अटी व शर्तीसाठी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे तहसिलदार, राहुरी यांनी कळविले
आहे.
Post a Comment
0 Comments