Type Here to Get Search Results !

व्हॉट्सऍप पोस्ट डिलीट केल्याच्या किरकोळ वादावरून सामान्य विद्यार्थ्याला कथित गुंडांकडून मारहाण

 पुणे विद्यापीठात  विद्यार्थ्याला मारहाण




पुणे  - विशेष प्रतिनिधी 

व्हॉट्सऍप पोस्ट डिलीट केल्याच्या किरकोळ वादावरून सामान्य विद्यार्थ्याला कथित गुंडांकडून मारहाण



सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने गृपवरील पोस्ट डिलीट केल्याच्या वादावरून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी विद्यार्थ्याला जबर मारहाण केली आहे. या मारहाणीत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. 

या प्रकरणात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे. गुरुवार, दिनांक २१ मार्च २०२४ रोजी रात्री बॉईज हॉस्टेल या व्हॉट्सऍप गृपवर एका कार्यकर्त्याने उमेदवारीची पोस्ट टाकली. 

सदर पोस्ट राजकीय असल्याने ऍडमिन असलेल्या विद्यार्थ्याने ही पोस्ट डिलीट केली.  शुक्रवारी या किरकोळ कारणावरून काही जणांनी या विद्यार्थ्याला जबर मारहाण केली. लाकडी काठी, खुर्ची विद्यार्थ्याच्या डोक्यात घालून विद्यार्थ्याला रक्तबंबाळ केले . अडविण्यासाठी गेलेल्या  काही विद्यार्थ्यांना  शिवीगाळ देखील करण्यात आली आहे. 

सदर गुंड प्रवृत्तीच्या हे बाहेरून विद्यार्थ्याला मारहाण करण्याच्या हेतूने विद्यापीठात आले होते. सदर एकही कार्यकर्त्याचा विद्यापीठात अधिकृत ऍडमिशन नाही. विद्यापीठामध्ये गेल्या काही महिन्यांपासून गुंडांचा हैदोस वाढलेला आहे, या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी तसेच विद्यापीठाच्या विद्यार्थ्याला आवारात येऊन बाहेरच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी  मारहाण केल्यामुळे विद्यापीठाने देखील पोलिसात तक्रार करावी ,  अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केले आहे.

Post a Comment

0 Comments