राहुरी - विशेष वृत्त
राज्य शासनाने नुकतेच ऐतिहासिक अशा अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर केल्याची घोषणा केली .
त्यानंतर जगभरातील ओळख अस
णाऱ्या गुगलवर अखेर अहिल्यानगर हे नाव अधोरेखित झाल्याचे दिसून आले . आपण आपल्या गुगलवर गेल्यास अहिल्यानगर हे स्पष्ट शब्दात नाव दिसून येत आहे .
नेटकरीमध्ये याची उत्सुकता लागलेली दिसून आली . याशिवाय नगर जिल्ह्यात यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. शासनाने अहिल्यानगर नावाची घोषणा केल्यानंतर गावागावांमध्ये जल्लोष व्यक्त केला गेला . अहिल्यादेवी यांचे केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे तर देशभरात मोठे योगदान आहे. काशी विश्वेश्वर , सोरटी सोमनाथ , रामेश्वरम या देवस्थानांचा अहिल्यादेवी यांनी जीर्णोद्धार केलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी जनमानसांसाठी बारव तयार करून पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. अहिल्यादेवींची बार म्हणून अनेक ठिकाणी याची ख्याती देखील आहे. त्यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे , नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात चौंडी हे त्यांचे जन्मस्थान आहे. अहिल्यानगर आता गुगलवर झळकल्याने जगभर ख्याती होत आहे.
Post a Comment
0 Comments