राहुरी - विशेष वृत्त
अनेक वर्ष बांधकाम सुरू असलेली राहुरीची वेस ( कमान ) आता खुली झाली आहे . लवकरच सुशोभित अशी कमान (वेस) राहुरीकरांना पहावयास मिळणार आहे .
राहुरी नगरपालिकेत शेजारील वेस म्हणजेच शहराचे प्रवेशद्वार ही जुनी ओळख होती. मात्र काही वर्षांपूर्वी नगरपालिकेच्या नवीन इमारतीमुळे जुनी वेळेस नामशेष झाली राहुरी ची जुनी वेस हे एक ओळख होती . याच वेशीतून अनेक धार्मिक कार्यक्रमांतर्गत प्रवेश व्हायचा . राहुरीच्या यात्रेतील कावडयांची मिरवणूक ही याच वेशीतून जायची .
नगरपालिकेची इमारत झाल्यानंतर अनेक वर्ष या ठिकाणी वेस व्हावी म्हणजेच कमान व्हावी , अशी राहुरीकरांची मागणी होती . अखेर राहुरी नगरपालिकेने या ठिकाणी कमान करण्याचे निश्चित करून बांधकाम देखील चालू केले . तसेच राहुरी शहरात प्रवेश होतो असे पाण्याची टाकी आणि धावडे पेट्रोल पंप शेजारील रस्त्यावर देखील कमानीचे काम सध्या सुरू आहे . लवकरच या कमान सुशोभित केल्यानंतर राहुरी शहराची आणखी एक नवीन ओळख निर्माण होणार आहे.
Post a Comment
0 Comments