Type Here to Get Search Results !

सराफाच्या प्रसंगावधानमुळे बनावट सोने विकणारे दोघे पकडले

राहाता शिर्डी- विशेष वृत्त



 ग्राहक बनवून आलेल्या दोन इसमांनी बनावट सोने व दुकानांची बोगस बिले दाखवत सोने विक्री करण्याचा प्रयत्न नगर जिल्ह्यातील राहाता येथील मुंडलिक सराफ येथे सराफाच्या प्रसंगावधानतेमुळे फसला. 

सराफ सुवर्णकार संघटनेचे पदाधिकारी प्रशांत मुंडलिक यांच्या राहाता येथील सराफ दुकानामध्ये स्विफ्ट गाडीमधून आलेल्या दोन इसमांनी बोगस दुकानांची बिले व बनावट सोने विक्री करण्याचा प्रयत्न केला . प्रशांत मंडलिक यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी  अन्य सराफ व्यावसायिकांना ही बाब लक्षात आणून सदर दोन इसम फसवणूक करत असल्याचे सांगत , या संबंधित  इसमांना पोलिसांच्या ताब्यात दिले .

ताब्यात देण्यात आलेल्या एक इसम जालना जिल्ह्यातील तर एक इसम छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील असून यासंदर्भात राहता पोलीस स्टेशनमध्ये पुढील कारवाई उशिरापर्यंत सुरू होती .

सोन्याचे भाव सध्या वाढलेले असल्याने बनावट सोने याकडे सराफ व्यावसायिकांनी लक्ष दिल्याचे यातून दिसून येते . राहता पोलिसांनी संबंधित दोन इसमानसह स्विफ्ट गाडी , बोगस बिले व बनावट सोने जप्त केले असून सराफ व्यावसायिकांनी सावध राहण्याची आवश्यकता सराफ सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे .

Post a Comment

0 Comments