राहुरी(प्रतिनिधी)
राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे साखर कारखान्याने देवळाली प्रवरा नगरपरिषदेची ७० लाख ९ हजार ३३० रुपये पाणीपट्टी थकविल्याने कारखाना कामगार वसाहतीचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. ऐन उन्हाळ्यात तनपुरे कारखाना कामगार कुटुंबियांना पाण्यासाठी वणवण करावे लागत असल्याने कामगार कुटूंबियांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
देवळाली प्रवरा नगरपरिषदेने तनपुरे कारखाना प्रशासकास वेळोवेळी पत्र व्यवहार करून थकीत पाणीपट्टी न भरल्यामुळे तनपुरे कारखाना कामगार वसाहतीचा पाणी पुरवठा गेल्या तीन दिवसांपासून खंडित करण्यात आला आहे.
तनपुरे कारखाना कामगार कुटुंबीयांना ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी हांडे, ड्रम घेऊन महिला व त्यांच्या घरातील सदस्यांना ' कोणी पाणी देत का पाणी' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
कामगार वसाहतीत हजारो लोक वास्तव्यास आहे. नगरपालिका व कारखाना प्रशासकीय अधिकारी यांनी लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरू करुन गरीब लोकांची हाल होणार नाही व उष्मघाताने एकदा बळी जाणार नाही याची नोंद घ्यावी अशी मागणी कामगार कुटूंबाने करून कारखाना प्रशासनाकडे फंड नसेल तर, कामगार वसाहतमधील कुटुंब नवीन कनेक्शन स्व- खर्चने घेण्यास तयार आहे. कारखाना नवीन मॅनेजमेंट येईपर्यंत, नगरपालिका व कारखाना प्रशासकीय अधिकारी यांनी तातडीने निर्णय घ्यावा.निर्णय होई पर्यंत प्रत्यक कॉलनीत टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा २ एप्रिल २०२४ पर्यंत सदर प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे
Post a Comment
0 Comments