Type Here to Get Search Results !

आ. निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनाम्याची घोषणा; विखे विरोधातील प्रबळ उमेदवार

अहिल्यानगर - विशेष वृत्त



 नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याचे विद्यमान आमदार आणि अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार व कायम चर्चेत राहिलेले डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या विरोधातील प्रबळ दावेदार असलेले पारनेरचे आमदार निलेश लंके यांचा आमदारकीच्या राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना इमेलद्वारे राजीनामा पाठविल्याचे केले घोषित केले आहे  .

 राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू आहे.  येत्या 13 मे 2024 रोजी अहमदनगर दक्षिण मतदार संघासाठी मतदान होणार आहे . त्यासाठी एप्रिल महिन्यात निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी सध्या राजकीय घडामोडी सुरू आहेत.  भाजपाने यापूर्वीच डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी नगर मधून जाहीर केली आहे . त्यामुळे त्यांना कोण टक्कर देणार ? यावर चर्चा सुरू होती. आता पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची घोषणा केल्यामुळे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर विखे विरोधात दंड थोपटतील !!  यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे .

Post a Comment

0 Comments