राहुरी - विशेष वृत्त
कोणत्याही क्षणी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात सध्या विविध विकास कामांचे भूमिपूजन , लोकार्पण , उद्घाटनासह मनोरंजनाच्या कार्यक्रमांचा विविध राजकीय पक्षांकडून धडाका लावला आहे .
पळा पळा कोण पुढे धावते या यूक्तीप्रमाणे विकास कामांची स्पर्धा तेजीत असून राहुरीतील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांपैकी बहुचर्चित ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजन समारंभ सोमवारी स्टेशन रोड परिसरात पार पडला. अचानक झालेल्या या समारंभाची चर्चा सर्वत्र सुरू आहे .
याशिवाय भूमिपूजन समारंभाच्या फलकावर सत्ताधारी शासनातील नेत्यांच्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक विरोधी आमदाराचे ठळक अक्षरात नाव देखील दिसून आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे . राहुरीतील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागा मंजुरी , निधी यावर गेल्या काही वर्षात चर्चा चरवन होत राहिले . सर्वांनी आपण प्रयत्न केल्याचे करत असल्याचे जाहीररित्या सांगितले .
ग्रामीण रुग्णालयाबाबत आर पी आय सह स्थानिक संघटनांनी वारंवार पाठपुरावा करीत अनेक वेळा आंदोलने केली . हा प्रश्न कायम प्रलंबित राहिला .
या पार्श्वभूमीवर सोमवारी स्टेशन रोड भागात शासकीय आय टी आय शेजारी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा नियोजन अंतर्गत ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारत बांधकामाचे भूमिपूजन ( सहा कोटी 51 लाख 88 हजार रुपये ) मंजुरीचा विखे पाटील यांच्यासह राहुरी तालुक्यातील स्थानिक नेत्यांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला . विशेष म्हणजे या समारंभातील फलकावर सध्याचे स्थानिक आमदार यांचा देखील नामोल्लेख ठळक अक्षरात दिसून येत होता . अचानक निवडणुका व आचारसंहिता सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हा भूमिपूजन समारंभ पार पडल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे .
दरम्यान आरपीआयने ग्रामीण रुग्णालय शहराबाहेर होत असल्याने त्यास विरोध दर्शवत रुग्णांची गैरसोय होणार असल्याने याला विरोध असून वेळप्रसंगी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिल्याने चर्चेत भर पडली आहे .
अधिक माहिती बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क -
Prasad Maid - 838
0091497
Post a Comment
0 Comments