Type Here to Get Search Results !

मार्च महिन्यातील राहुरीचा उन्हाचा तडाखा कायम

 राहुरी - विशेष वृत्त

मार्च महिना संपायला आला आहे , परंतु थंडीच्या कडाका थांबताच आता उन्हाच्या चटक्याने राहुरीकर मात्र होरपळून गेले आहेत .जाणकारांच्या मते ग्लोबल वार्मिंगच्या परिणामामुळे असे विचित्र हवामान पहावयास मिळत आहे .

गेल्या आठवडाभरापासून राहुरीकरांसह सारेच विचित्र हवामानाला सामोरे जात आहेत . कधी रात्री थंडी दिवसा कडाक्याचे ऊन आणि मध्येच आभाळ भरून येणं असे विचित्र वातावरण पहावयास मिळत आहे .

 गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून जागतिक हवामानातील बदल , ग्लोबल वार्मिंग व निसर्गाच्या विरोधात होत असलेले गैरप्रकारांमुळे वातावरणामध्ये बदल होत असल्याचे सांगितले जात आहे . यंदाच्या वर्षी मार्च महिन्याच्या प्रारंभी राहुरीचा किमान तपमान मध्ये दहा अंशापर्यंत घट झाली होती . तर आता मार्च अखेरीस कमाल तापमानामध्ये म्हणजेच दिवसाचे तापमान 40 ° पर्यंत जात असल्याचे चित्र आहे . 

नगर जिल्ह्यातील एकमेव भारतीय हवामान शास्त्र विभागाचे आय एम डी चे केंद्राचे प्रभारी अधिकारी मोहनराव देठे यांच्या म्हणण्यानुसार , वातावरणातील बदलांमुळे तापमानात चढ-उतार होत आहे . पुढील काळात आणखी तापमान वाढ शक्य असल्याचेही श्री देठे यांचे म्हणणे आहे , तर स्थानिक सतर्क राहुरी या स्थानिक अभ्यास ग्रुप कडून सध्याच्या वातावरणातील बदलाला मोठ्या प्रमाणात निसर्गाच्या विरोधात झालेल्या घडामोडी कारणीभूत असल्याचे म्हटले आहे . 

आय एम डी चे माहितीनुसार गेल्या 10 - 15 वर्षापासून मार्च महिन्यामध्ये 40 ते 41 अंश तापमानापर्यंत पारा गेलेला आहे तर किमान तापमान दहा अंशाच्या ही खाली आलेले आहे . एकंदरीतच तापमानातील चढउतारामुळे केवळ नागरिकच नव्हे तर पशुधन , शेती , शेतकरी यांना देखील याचा फटका बसत असल्याचे चित्र असल्याने पर्यावरण विषयक जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे पर्यावरण पर्यावरण प्रेमींकडून सांगण्यात येत आहे



.

Post a Comment

0 Comments