Type Here to Get Search Results !

राहुरीचा बगीचा होणार कालबाह्य ; सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम सुरू

 राहुरीच्या ज्ञानेश्वर उद्यान बगीच्यातच होणार सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प ! बगीचा होणार कालबाह्य ; राहुरीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर चर्चेला उधाण

राहुरी -  विशेष वृत्त 





राहुरी शहरातील सांडपाणी व मैला व्यवस्थापनासाठी सांडपाणी प्रक्रिया केंद्र ( मल निस्सारण केंद्र ) राबविण्यात येणार असून या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येणार असल्याने हे सांडपाणी प्रक्रिया केंद्र मुळा नदीच्या पुलाजवळ ज्ञानेश्वर उद्यानातच होणार असून राहुरीकरांसाठी मात्र आठवण असणारा राहुरीचा बगीचा ( ज्ञानेश्वर उद्यान ) कालबाह्य होणार असल्याने याची जोरदार चर्चा यात्रेपूर्वीच सुरू झाली आहे .

राहुरीचे ग्रामदैवत खंडेराय महाराजांच्या मंदिर व यात्रेत आलेल्या भाविकांना राहुरीचा बगीचा माहिती नाही , असे होऊ शकत नाही . सध्या या ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम युद्धपातळीवर सुरू आहे .

राहुरीत होणार्‍या या महत्वाच्या मानल्या


जाणाऱ्या मल निसारण केंद्र प्रकल्पाकरिता भुयारी गटार योजनेचे सर्वेक्षण करणाऱ्या सल्लागार संस्थेने मार्गदर्शन केले नंतर डिसेंबर 2022 मध्ये काउंटर सर्वेनुसार शहरातील विविध भागात संकलित होणारे सांडपाणी एकत्रितरित्या शहराची व भौगोलिक स्थिती पाहता योग्य पद्धतीने प्रवाह होण्याकरिता मुळा नदी लगत योग्य जागा उपलब्ध असल्याचे नगरसेवकांच्या समितीच्या सभेत हा विषय चर्चेत आला होता . नगर मनमाड रोड वरील मुळा नदी काठी ज्ञानेश्वर उद्यानालगतची जवळपास 0.72 हेक्टर आर गुंठे इतकी जागा निश्चित झाली . 

राहुरी शहर व आजूबाजूच्या उपनगरांचा वाढता विस्तार , शहरात बाहेरून येणाऱ्या संख्येचा विचार करता शहरातील पिण्याचे पाण्यासह अन्य सुविधा नागरिकांना देणे क्रमप्राप्त असल्याने विविध योजनांचे विषय चर्चेत घेऊन , त्यावरील सर्वेक्षण करून पुढील 25 ते 30 वर्षा पर्यंत लोकसंख्या विचारात घेऊन राहुरी नगरपालिका व सत्ताधारी यासंदर्भात योग्य निर्णय घेतला . यापैकीच एक राहुरी नगरपालिके अंतर्गत भुयारी गटार योजना राबविण्यात येणार असून शासनाच्या धोरणानुसार गटारी मधून वाहणारे सांडपाणी यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे . 

पालिका हद्दीअंतर्गत शहरातील सांडपाणी व मैला व्यवस्थापनासाठी मल निस्सारण केंद्र ( एस.टी.पी. ) सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी भौगोलिक दृष्ट्या योग्य ठिकाण पालिकेच्या मालकीच्या बगीच्या लगतच निश्चित केली गेली . निश्चित केलेल्या जागे संदर्भात नागरिकांच्या सूचना किंवा हरकती घेतल्यानंतर हा सांडपाणी प्रक्रिया केंद्र सध्या याच उद्यानात होत आहे . राहुरी शहराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प शहराच्या स्मार्ट सिटी मध्ये निश्चित बदल घडून येणारा असणारा आहे . मात्र असे असताना पन्नास वर्षाहून अधिक काळापासून आकर्षण असलेला राहुरीचा बगीचा मात्र आता कालबाह्य होणार आहे . प्रकल्पाचे काम करताना बगीच्या मधील अनेक खेळणी , साहित्य व जुनी झाडे काढावी लागली आहे . 

राहुरीच्या खंडेराय महाराज यात्रेला आलेला राहुरीकर बगीचा मध्ये गेल्याशिवाय राहत नसायचे . आता याच ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काम सुरू असून लवकरच खंडेराय महाराजांची यात्रा होणार असल्याने राहुरीच्या या बगीचेचा ( ज्ञानेश्वर उद्यान ) विषय चांगला चर्चेत आलेला आहे .

Post a Comment

0 Comments