राहुरीत सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने हायवे वरील सुरक्षेचा बंदोबस्त शानदार झाल्याने राहुरी करामध्ये समाधान
राहुरी - विशेष वृत्तराहुरी शहरात जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विखे पाटील यांच्या जनसेवा फाउंडेशन च्या वतीने भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आज आयोजन करण्यात आले .
या महोत्सवाला मोठा प्रतिसाद मिळाला .या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका सांस्कृतिक महोत्सव च्या निमित्ताने राहुरीतील नगर मनमाड रस्त्यावरील चौका चौकात आज विशेष सुरक्षा व्यवस्था दिसून आली . प्रसिद्ध गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या या भव्य कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते . कार्यक्रमाला होणारी गर्दी लक्षात घेता नेहमीच गजबजलेला राहुरी शहरातील नगर मनमाड रस्ता आज पाण्याच्या टाकी पासून नांदूर रस्ता चौकापर्यंत सुरक्षारक्षकांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने अगदी केंद्राचे मोठे मोठे नेते आल्यासारखे चित्र दिसून येत होते .
सर्व यंत्रणा ही प्रवराची असल्याची चर्चा मात्र सुरू होती .
बाजार समिती परिसर , राहुरी न्यायालय परिसर , खंडोबा मंदिर परिसर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरून आलेल्या खाजगी बसेसची व्यवस्था पार्किंगची व्यवस्था ही करण्यात आली होती . जनसेवा फाउंडेशनच्या या भव्य महिलांसाठी असणाऱ्या सांस्कृतिक महोत्सवाला राहुरीतील उपनगरीय व ग्रामीण भागात तील महिलांपर्यंत व्यवस्थित माहिती न गेल्याने एवढा मोठा कार्यक्रमापासून वंचित राहिल्याने महिला वर्गात नाराजी व्यक्त होत आहे . एरवी राहुरी येथील नगर मनमाड रस्त्यावर वाहतुकीची कोंडी विद्यार्थी , महिला , ज्येष्ठ नागरिकांची रस्ता ओलांडण्यासाठी कसरत सुरू असताना आज राहुरीकरांनी सर्व महत्त्वाच्या रस्त्यांवर सुरक्षारक्षकांत सह पोलिसांची व्यवस्था दिसून आल्याने समाधान व्यक्त केले आहे .
अधिक माहिती व बातम्या साठी संपर्क -
Prasad Maid- 8380091497
Post a Comment
0 Comments