राहुरी फॅक्टरी - श्रीकांत जाधव
देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडून डॉ.तनपुरे साखर कारखाना प्रशासनाने पाणी पट्टी भरली नाही म्हणून ऐन उन्हाळ्यात पाणी पुरवठा खंडित केल्याने राहुरी फॅक्टरी येथील राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे.
राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत मुसमाडे यांच्या माध्यमातून कारखाना कॉलनीत टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे.
राजमुद्रा हॉटेल बोरचे पाणी वापरण्यासाठी 24 तास उपलब्ध असून गरजू नागरिकांनी घेऊन जावे राजमुद्राचे अध्यक्ष प्रशांतदादा मुसमाडे यांनी केले असून सर्व ग्रुप, प्रतिष्ठान, माजी नगरसेवक टँकर ने पाणी पुरवठा करावा व ज्यांच्या कारखाना परिसरात बोर, विहीरी आहेत त्या पाण्यासाठी उपलब्ध करून द्याव्यात अशी विनंती प्रशांत मुसमाडे यांनी केली
पाणी मिळणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे आपण नागरिकांना मूलभूत अधिकारण पासून वंचित ठेवत आहात, आपण त्वरित पाणी पुरवठा सूरु न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा कारखाना प्रशासन व नगर पालिका,जिल्हा बँक, तहसीलदार यांना राजमुद्रा प्रतिष्ठानने दिला आहे.
टॅंकर द्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी राजमुद्रा प्रतिष्ठानचे प्रशांत दादा मुसमाडे, विशाल मुसमाडे,सोमा शिंदे, निखिल गोपाळे, प्रमोद बर्डे,दीपक कोल्हे, शोएब तांबोळी, किरण चव्हाण, सलीम शेख, गणेश मुसमाडे आदी परिश्रम घेत आहे
Post a Comment
0 Comments