राहुरी - विशेष वृत्त
( सौजन्य- निवडणूक विभाग ) |
येत्या 13 मे 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी गुरुवारपासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे . राहुरी विधानसभा मतदारसंघात तीन तालुक्याचे मतदार लोकसभेसाठी समाविष्ट असल्याने यास महत्व प्राप्त आहे . राहुरी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात 39 हजार 090 मतदारांची वाढ झाली असून तुलनेने गत पाच वर्षात ही वाढ दुप्पट आहे .
राहुरी शहरात व परिसरातील 32 मतदान केंद्रावर एकूण 32 हजार 752 मतदार असून राहुरी तालुक्यातील अन्य मोठ्या पाच गाव व त्यांच्या परिसरात 39 मतदान केंद्रांवर 40 हजार 766 इतके एकूण मतदार आहेत . यात वांबोरी ( 16 मतदान केंद्र ) बारागाव नांदूर ( 7 मतदान केंद्र ) ब्राह्मणी ( 6 मतदान केंद्र ) उंबरे ( 5 मतदान केंद्र ) तर राहुरी खुर्द , गोटीबंआखाडा येथे चार मतदान केंद्रांमधील मतदारांचा यात समावेश आहे .
तर राहुरी विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या नगर , पाथर्डी तालुक्यातील सहा मोठ्या गावांमध्ये व या गावांच्या परिसरातील जवळपास 51 मतदान केंद्रांवर 55 हजार 005 मतदार आहेत . यामध्ये नागरदेवळे व परिसर 14 मतदान केंद्रे , भिंगार व परिसर 13 मतदान केंद्रे , जेऊर व परिसर दहा मतदान केंद्रे , बुराननगर पाच मतदान केंद्रे तर तिसगाव येथे पाच आणि पिंपळगाव माळवी येथील चार मतदान केंद्रे , यातील मतदारांचा समावेश आहे .
एकूण एकंदरीतच चित्र पाहता तीन तालुक्यातील 122 मतदान केंद्र व केंद्रावर एक लाख 28 हजार 518 एकूण मतदार आहेत . त्यामध्ये 66 हजार 535 पुरुष तर 58 हजार 989 महिला मतदार आहेत . अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघात आज अखेर 3 लाख 10 हजार 517 मतदार असून त्यात एक लाख 62 हजार 436 पुरुष तर एक लाख 48 हजार 81 महिला मतदार आहेत . त्यामुळे या मतदारांच्या मोठी संख्या असलेल्या मतदान केंद्राभोवतीची गावी व तेथील मुद्दे याकडे सर्वच राजकीय पक्ष व राजकीय नेत्यांनी लक्ष वेधल्याचे सध्या चे चित्र दिसत आहे .
Post a Comment
0 Comments