शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी छाननीत या 9 उमेदवारांचे अर्ज अवैध
शिर्डी - विशेष प्रतिनिधी
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८ शिर्डी लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. यात ३१ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले , तर ९ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज नाकारण्यात आले .
नामनिर्देशन अर्ज वैध ठरलेल्या २२ उमेदवार असे भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना - उध्दव बाळासाहेब ठाकरे) , लोखंडे सदाशिव किसन (शिवसेना) , चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष) , अभिजीत अशोकराव पोटे (अपक्ष) , भारत संभाजी भोसले (समता पक्ष) , नितीन पोळ (बहुजन भारत पार्टी) , बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष) , अॅड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपशा) , अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित) लोकशाही पार्टी), सतिष भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज) पक्ष), उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी), गंगाधर राजाराम कदम (अपक्ष), भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष), प्रशांत वसंत निकम (अपक्ष), खरात नचिकेत रघुनाथ (अपक्ष), संजय हरिश्चंद्र खामकर (बळीराजा पक्ष), राजेंद् रत्नाकर वाघमारे (राष्ट्रीय जनक्रांती पार्टी), रविंद्र कलय्या स्वामी (अपक्ष), खाजेकर विजयकुमार गोविंदराव (अपक्ष) व सना मोहंमद अली सय्यद (अपक्ष) असे आहेत.
नामनिर्देशन पत्र अर्ज अवैध/नाकारण्यात आलेले अर्जदार असे राजू शिवराम खरात (बहुजन समाज पार्टी), डोळस जयाबाई राहूल (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A), अशोक अनाजी वाकचौरे (अपक्ष), चंद्रहार त्र्यंबक जगताप (अपक्ष), शंकर संभाजी भारस्कर (अपक्ष), दिलीप भाऊसाहेब गायकवाड (अपक्ष), डॉ. अशोक बाजीराव म्हंकाळे (अपक्ष), संतोष तुळशीराम वैराळ (अपक्ष) व सतिष भुपाल सनदी (अपक्ष) असे आहेत.
नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल सायंकाळी ३ वाजेपर्यंत आहे. नामनिर्देशन मागे घेण्याची अंतिम तारीख २९ एप्रिल सायंकाळी ३ वाजेपर्यंत आहे. नामनिर्देशन अर्जात नमूद केलेल्या पक्षानुसार चिन्ह वाटप केले जाईल. जे उमेदवार अपक्ष उभे राहतील त्यांनाही स्वतंत्र चिन्ह दिले जाईल. २९ एप्रिल रोजी तीन वाजेपर्यंत निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल.
Post a Comment
0 Comments