राहुरी (प्रतिनिधी)
आरपीआय च्या काही कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे राहुरी तालुक्यातील महसूल विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. तलाठी यांच्या खोट्या सह्या करून चाप्टर केसमधील आरोपींकडून अनाधिकृतपणे पैसे गोळा करण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप आरपीआय च्या कार्यकर्त्यांनी केला. तसेच तहसिलदार व खोट्या सह्या करून अनाधिकृतपणे पैसे वसुल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात बाबत तक्रार करण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या अहमदनगर जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विविध गुन्ह्यातील आरोपींना तहसिलदार यांच्याकडून अनेक जणांना नोटिस बजावण्यात आल्या. सदर प्रक्रियेमध्ये आरोपी जामीनदार घेऊन तहसिलदार यांच्या समोर हजर झाले असता महसूल विभाग कर्मचाऱ्यांकडून गाव नमुना नऊ अ या पावतीवर तलाठी यांच्या खोट्या सह्या करून प्रत्येक चाप्टर केसमागे १०० रुपए घेतले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून तहसिल कार्यालयातून सुमारे एक ते दिड हजार आरोपींना नोटिस बजावण्यात आल्या.
या घटने बाबत निलेश दिनकर शिरसाठ, रा. बालाजी रोड, राहुरी. यांनी नाशिक येथील आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. त्या तक्रार अर्जात म्हटले आहे कि, राहुरी येथील तहसिलदार नामदेव पाटील यांनी राहुरी तहसिल कार्यालयामध्ये तलाठी पदाच्या नावे व स्वाक्षरीने गाव नमुना नऊ 'अ' जमिनीच्या पावत्यांच्या गैरवापर करुन चाप्टर केसच्या नावाखाली केलेल्या बेकायदेशीर वसुलीची तात्काळ चौकशी होऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर प्रशासकिय कार्यवाही करुन त्यांचे सेवा पुस्तकात त्यांचे गैरवर्तनाची नोंद करण्याची मागणी केली. तसेच चाप्टर केस प्रकरणासाठी सक्तीने १०० रुपये प्रति नागरीक वसुल करुन त्यांना बनावट राजमुद्रा असलेल्या व त्या पावत्यांचा या प्रकरणांशी कसलाही संबंध नसतांना बोगस वसुली करुन प्रतिबंधनात्मक कारवाई करण्याच्या नावाखाली जाणीवपुर्वक मानसिक त्रास देण्याचे काम केले आहे.
आरोपी दोषी किंवा निर्दोष याबाबत न्यायालयामध्ये केसेस प्रलंबीत असतांना तहसिलदार नामदेव पाटील हे आपल्या पदाचा दुरुपयोग करून नागरीकांची इच्छा नसतांना त्यांचेकडुन सक्तीचे पैसे वसुली करत आहेत. तहसिलदार यांची मनमानी व पदाचा दुरुपयोग करुन केलेल्या गैरवर्तनाची आयुक्तांनी तात्काळ दखल घेऊन संबंधीतांची खातेनिहाय चौकशी करुन त्यांचेवर प्रशासकिय निलंबनासह कारवाई करावी. अशी तक्रार करण्यात आली.
या घटने बाबत सखोल चौकशी होऊन दोषी असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा आरपीआय तालूकाध्यक्ष विलास साळवे यांनी दिली.
Post a Comment
0 Comments