रमजान ईद राहुरी शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा
राहुरी ( विशेष प्रतिनिधी )
मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण असलेला ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईद राहुरी शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
राहुरी शहरातील ईदगाह मैदानावर सुमारे दहा हजार मुस्लिम बांधवांनी मूफ्ती मुजम्मिल सहाब यांच्या नेतृत्वाखाली नमाज पठण केले. हिंदुस्थानात शांतता नांदावी, सर्वत्र बंधुभाव निर्माण व्हावा, भरपूर पाऊस पडावा, देशात समृद्धी निर्माण व्हावी, सर्वांवर अल्लाची कृपा व्हावी अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली. मुफ्ती मुजम्मिल साहब, मुफ्ती अफजल साहब, मौलाना असलम साहब, मौलाना कमर साहब आदींच्या मार्गदर्शनाखाली नामाजचे पठण झाले. यावेळी माजी मंत्री आमदार प्राजक्त दादा तनपुरे, मार्केट कमिटीचे चेअरमन अरुण तनपुरे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर, अरुण ठोकळे, भारत भुजाडी, पांडू उदावंत, अरुण साळवे, अरूण ठोकळे आदींनी मुस्लिम बांधवांना ईदगाह मैदानात शुभेच्छा दिल्या. तसेच विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे,माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी खासदार प्रसाद तनपुरे, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट सुभाषराव पाटील, युवा नेते भैय्यासाहेब शेळके, कामगार नेते इंद्रभान नाना पेरणे, प्रहारचे सुरेश लांबे, पत्रकार विनीतराव धसाळ, मनोज साळवे, ईश्वरशेठ सुराणा उप अभियंता दिलीप शिरसाठ, किरण साळवे, नगरसेवक संजूभाऊ साळवे आदींसह हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. राजवाडा जय भीम मित्र मंडळाच्या वतीने यावेळी मुस्लिम बांधवांना सरबतचे वाटप करण्यात आले. राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर, सोनगाव, राहुरी फॅक्टरी, देवळाली प्रवरा टाकळीमिया, वांबोरी मानोरी, आदी ठिकाणीही ईद उत्साहा साजरी करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मराज पाटील व सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.
Post a Comment
0 Comments