Type Here to Get Search Results !

राहुरीचा पारा ४० अंशापार अनेकांच्या झोपा उडाल्या

 राहुरीचा पारा 40° सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने अनेकांच्या झोपा उडाल्या

राहुरी - विशेष वृत्त
राहुरी तालुक्यासह अनेक भागात सध्या तापमानाचा पारा चाळीशीकडे वाटचाल करत आहे. आजचा पारा 40 पर्यंत पोहोचला असून गेल्या महिनाभरापासून हवामाना चढउतारामुळे सर्वांचेच गणित चुकत असल्याचे चित्र दिसून येत आहे .


गेल्या दहा वर्षात 2017 मध्ये मार्च महिन्यात राहुरीचा पारा चाळीशी पार झाला होता . 

यंदाच्या वर्षीही मार्च अखेरपर्यंत किमान तापमान 9° सेल्सिअस पर्यंत जरी गेले असले तरी उन्हाच्या तडाख्यामुळे तापमान 40°c पर्यंत पोहोचले होते . सध्या एप्रिलचा दुसरा आठवडा संपत आहे . चार दिवसांपासून राहुरी सह जिल्ह्यातील तापमानाचा पारा चढउतार करत असल्याचे दिसून येत आहे .

राहुरी येथील हवामान शास्त्र विभाग आयएमडी च्या माहितीनुसार , सोमवारी राहुरी चे कमाल तापमान 39.4° सेल्सिअस इतके नोंदवले गेले . गेल्या पाच दिवसांपूर्वी हेच तापमान 36°c वर होते . याबरोबरच रात्रीच्या तापमानातही वाढ होत कालचे रात्रीचे तापमान 25.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेल्याची माहिती आयएमडी च्या केंद्राचे प्रभारी मोहनराव देठे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.  पुढील काळातही तापमानामध्ये चढ-उतार अपेक्षित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले .
एकंदरीत गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानामध्ये दिवसा आणि रात्रीही चार ते पाच अंशाने वाढ झाली असल्याने जनसामान्यांच्या झोपा उडाल्याचे चित्र आहे . त्यातच पुढील काही दिवसात अवकाळी पावसाचे संकेत हवामान विभागाने दिल्याने त्यातच संकटाची भर पडली आहे .

Post a Comment

0 Comments