Type Here to Get Search Results !

राहुरीतील रस्ते खोदाई कोणाच्या मुळावर

 राहुरी - विशेष वृत्त

राहुरी सध्या एका जोकची ( उपहासात्मक विनोद ) कोण होणार करोडपतीमध्ये कोटीचा प्रश्न - कोणत्या कारणाने राहुरी शहर व परिसरातील रस्ते खोदाई करण्यात आली ? त्यावर उत्तरांचा पर्याय -1.पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने 2. वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईन मुळे 3. शहरालगत रस्त्यावरून गेलेल्या गॅस पाईपलाईन मुळे आणि 4. सांडपाणी प्रकल्पाच्या पाईपलाईन मुळे . उत्तरातील संभ्रमामुळे मात्र कोण होणार करोडपतीचा कम्प्युटर डायरेक्ट बंदच !

हा झाला उपहासात्मक विनोदाचा भाग , मात्र या प्रश्नावलीची जोरदार चर्चा सध्या शहरवासीयांमध्ये सुरू आहे .

 राहुरी शहरातील विविध रस्ते आणि नगर मनमाड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात उडत असलेल्या मात्रट धुळीने ,फुफाट्यामुळे अनेकांना सध्या श्वसनाचा त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी चर्चेत आलेल्या आहेत .

 राहुरी शहरात यापूर्वी वाढीव पाणी पुरवठा योजनेमुळे गल्लोगल्लीतील रस्ते खोदून काळ्या रंगाचे पाईप टाकण्यात आलेले आहेत. त्यानंतरच्या काळात 92 कोटी रुपयांच्या सांडपाणी प्रकल्पासाठी 40 किलोमीटर अंतर पूर्ण होईल , असे प्रत्येक प्रभागांमध्ये उपनगरामध्ये रस्ते खोदून सांडपाण्याची पाईपलाईन देखील टाकण्यात आलेली आहे . राहुरीतील बहुतांश कामांचे श्रेय सर्वच गट तट पक्ष नेते घेत आहेत , असे असले तरी मधल्या काळात अनेक ठिकाणी जुनी असलेली पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्याने रस्ते खोदण्याची वेळ पालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर आलेली आहे .

नगर मनमाड रस्त्यावरून शहरातून गेलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामामुळे मुळा नदीच्या पुलापासून भुजाडी पेट्रोल पंपाच्या भागापर्यंत तीन किलोमीटर पर्यंत रस्त्याच्या कडेला खोद कामामुळे रस्त्यावर आणि शहरांमधील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात धूळ , मात्रट फुफाटा , धुलीकन यांचा धुराळा उडत असल्याने अनेकांना श्वसनाचे त्रास जाणवत असल्याचे चर्चिले जात आहे . रस्ते खोदाई नंतर खड्डे पडल्याने अनेकांना पायी चालणाऱ्यांना व वाहन चालकांना देखील समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे .

शहरातील कमान वेशीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने हे काम पूर्ण झाल्यानंतरच शहरांतर्गत रस्ते आणि नगर मनमाड रस्त्यावरील डांबरीकरण पूर्ण होण्याची शक्यता राहुरी शहरवासीयाकडून व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीतच रस्ते खोदाई नंतरच्या धूळ मातीच्या धुराळा ची मात्र चांगलीच चर्चा सध्या सुरू आहे .

Post a Comment

0 Comments