*महिलांना सशक्त करण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले - अनुसंगम शिंदे*
राहुरी(प्रतिनिधी) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती प्रगती विद्यालय व निळा झेंडा कॉर्नर येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन शहरातील कापड व्यापारी,कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे योगेशसेठ चुत्त्तर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अनुसंगम शिंदे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.राजेंद्र जाधव यांनी केले.
प्रगती विद्यालयाचे प्राचार्य अशोक पलघडमल यांनी आपल्या मनोगतात देशाचे संविधान, भारतीयांना मिळालेले अधिकार,बाबासाहेबांची महानता विषद केले.
अध्यक्षीय भाषणात अनुसंगम शिंदे यांनी भारतीय राज्यघटना,महिलांना घटनेने दिलेले अधिकार,समता,बंधुता,सर्वधर्मसमभाव या बाबी कथन केल्या.
कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते निसारमामु पिंजारी, श्रीम.मंगल मंडलिक, श्री.राजेंद्र जाधव,श्री.जयराम शिंदे,श्रीम.सुरेखा तुपे,श्रीम.राठोड सोनी,श्री.भारत कोळसे,श्री.राजेंद्र जोशी,श्री.गणेश इंगळे,श्रीम.प्रतिभा कोळपकर ,श्री.नवनाथ धनवडे,विद्यार्थी - विद्यार्थिनी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. शारदा मुसळे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री.जयराम शिंदे यांनी केले.
Post a Comment
0 Comments