आमदार निलेश लंके राहुरीत म्हणाले आमची शोलेची दोस्ती
राहुरी - विशेष वृत्त
नगर दक्षिण लोकसभेचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी आज राहुरी येथील सभेत आमदार प्राजक्त तनपुरे आपले मार्गदर्शक असून त्यांची हुशारी आणि माझा खमकेपणा पुढील काळात शेतकऱ्यांसाठी नक्की कामाला येईल , असे म्हणत आमची शोलेची दोस्ती आहे असे म्हणताच प्रचार सभेतील उपस्थित हजारो लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यास दाद दिली .
शरद पवार पक्षाच्या पक्षाचे उमेदवार लंके यांच्या प्रचारार्थ आज राहुरीत प्रचार सभा पाण्याच्या टाकीजवळ पार पडली . भर दुपारी हजारोंच्या संख्येने या सभेस गर्दी पहावयास मिळाली . यावेळी आमदार उमेदवार आमदार निलेश लंके यांनी आपल्या शैलीमध्ये खासदार डॉक्टर विखे
यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला व आपल्या शैलीची ओळख करून दिली . शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आपण खासदार झाल्यावर संसद संसदेत आवाज उठवू असे म्हणत अनेक प्रश्नांवर उहापोह केला .
राष्ट्रवादी चे नेते शरद पवार यांनी आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत 3650 दिवसात महागाई , गॅस , पेट्रोलचे भाव कमी करता आले नसल्याची टीका केली . सध्या सत्तेचा गैरवापर सुरू असल्याचे सांगून पवार म्हणाले की , आता मोदींची गॅरंटी चालणार नाही . विचाराच्या विरोधात जाणाऱ्यांना मोदी साहेबांनी चौकशीसंस्था मागे लावल्याचा आरोपही यावेळी पवार यांनी केला .
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या भाषणात महायुती सरकारवर ताशेरे उडवत म्हटले की , आघाडीच्या काळातील अनेक प्रकल्प या सरकारने बंद पाडले . शेतकरी विरोधी सरकार घालवण्यासाठी निलेश लंके यांना निवडून द्यायचे आहे . राहुरी तालुका काय आहे हे चार तारखेला कळेल , असे खासदार विखे यांचे नाव न घेता तनपुरे यांनी टोला लगावला .
Post a Comment
0 Comments