राहुरीतील हे मतदान केंद्रे असतील वैशिष्ट्यपूर्ण
राहुरी - विशेष वृत्त
लोकसभा निवडणुकीसाठी राहुरी विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रे हे वैशिष्ट्यपूर्ण असतील . त्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या निर्देशाने निवडणूक प्रशासनाने यासंबंधी मतदान वाढीसाठी तयारी सुरू केली आहे .
223 राहुरी विधानसभा मतदारसंघातील राहुरी शहरातील भागीरथीबाई तनपुरे विद्यालयातील एक मतदान केंद्र पूर्णपणे महिला संचलित केंद्र ( सखी मतदान केंद्र ) असेल . या केंद्रात मतदान केंद्र अधिकारी , सहाय्यक अधिकारी , मदतनीस , बंदोबस्तातील पोलीस , हे सर्व महिला असतील . या केंद्राचे आणखी वैशिष्ट्य असे येथील महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा 32 ने अधिक आहे .
राहुरी शहरातील प्रगती विद्यालयातील एक मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र असेल , याशिवाय याच विद्यालयातील आणखी एक मतदान केंद्र युवा कर्मचाऱ्याद्वारे संचलित असे मतदान केंद्र असेल . या केंद्रावर देखील पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या 42 ने अधिक आहे . या मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकाऱ्यांसह सर्व स्टाफ हा युवा कर्मचारी , अधिकारी असेल .
राहुरी विधानसभा मतदारसंघातील वांबोरी येथील महेश मुनोत विद्यालयातील एक मतदान केंद्र हे मॉडेल मतदान केंद्र असेल तर याशिवाय राहुरी शहरातील नूतन मराठी शाळा नंबर एक येथे दिव्यांगासाठी (पीडब्ल्यूडी) मतदान केंद्र असणार असून येथे दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प असेल व अन्य सुविधा उपलब्ध असतील .
एकंदरीत येत्या 13 मे रोजी होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सध्या 223 राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाची तयारी जोरदार सुरू आहे . सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नामदेव पाटील , निवासी नायब तहसीलदार श्रीमती पुनम दंडिले , निवासी नायब तहसीलदार श्रीम.संध्या दळवी ,नायब तहसीलदार ( संजय गांधी योजना)सचिन औटी ,निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार विशाल सदनापूर व अनिल टेमक आदी प्रयत्नशील आहेत .
Post a Comment
0 Comments