Type Here to Get Search Results !

आता लग्नसमारंभात वर वधू च्या एंट्रीला गाजतय हे गीत

 बजावो ढोल स्वागत मे मेरे घर राम आये है या भक्तीगीताने घातली भुरळ 



अहिल्यानगर - ( किरण सिंह चंदेल ) - विशेष वृत्त

महाराष्ट्रामध्ये लग्नाच्या विधी अनेक प्रकारच्या आहेत नव्वदच्या काळात ढोलताशांच्या अस्सल महाराष्ट्रीयन वाद्यांच्या लग्नाची वरात निघायची . वरात जर रात्री असली तर ऊजेडासाठी टेंभ्याचा वापर करत त्यानंतरच्या काळात जराशी सुधारणा होवून ब्रास बँड चा जमाना आला. 

त्यात कलाकारीचे कसब दिसायचे , आणी बँडवर वाजवलेल गाणदेखील खुप मधुर वाटायचे . वरात चालू असताना लग्न घरापेक्षा बाहेरचीच मंडळी जास्त असायची. मग ते काही शौकीन जुने आवडीचे गाणे

आवर्जून वाजवायला सांगत .

विसाव्या शतकात बँन्जो गाडी बँड पथकात सामील झाली . तेथूनच ब्रासबँडवर गाणे ऐकण्याची मधुरता कमी व्हायला लागली .

 आता तर ढोलताशा इतिहासजमा जमा होतो की काय ? अशी परिस्थिती निर्माण झाली . कारण डीजेच्या मोठाल्या भिंती , त्यातुन येणारा जिवघेणा कर्कश आवाज , ऐकावेसे देखील वाटत नाही .

पण यासगळ्या बदलत्या काळात एका गाण्याने मात्र

महाराष्ट्रात रसिकांच्या मनावर राज्य केल ! ते म्हणजे

लग्न मंडपात वधुवर मंडपाच्या गेट पासुन व्यासपीठावर येई पर्यंत बहारो फुल बरसावो मेरा महेबुब आया है हे १९६६ साली प्रदर्शित झालेल्या सुरज सिनेमातल

गाण हमखास वाजवल जायच . 

या गाण्याने जवळपास पन्नास वर्षे रसिकांच्या मनावर राज्य केल . महाराष्ट्रात काही ठिकाणी यावेळी महाराष्ट्र गीत देखील वाजवले जाते , कारण याप्रसंगाला साजेस गाणच नव्हत . 

पण परवा एका लग्नात वधू वर व्यासपीठावर येताना जुबीन नौटीयाल यांनी स्वरबध्द केलेल " बजावो ढोल स्वागत मे मेरे घर राम आये है "हे भजन लावल. मंडपातल वातावरण एकदम बदलून गेले . त्यात नुकतेच आयोध्ये राममंदिर ही झाले त्याचा आनंद अजूनही आहे .

 त्यामुळे हे गीत लावल्यावर मंगलमय वातावरण झाले . या भक्तीगीता मुळे बहारो फुल बरसावो हे गाण की ज्या गाण्याने पन्नास वर्ष रसिकांवर राज्य केलं , त्या गीताची जागा आता श्रीरामाच्या " बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आये हे " या सुंदर आणखी प्रसंगानुरूप गीताने घेतली , हा बदलच म्हणावे लागेल .

 बर्याच वर्षां नंतर लग्नात आता भारतीय संस्कृती ला शोभेल असे गीत मिळाले . या विषयाची चर्चा सध्याच्या लग्न करायच्या हंगामात ग्रामीण भागात सुरू आहे

Post a Comment

0 Comments