Type Here to Get Search Results !

आ..बा..बाबा...बा राहुरीच्या तापमानाने केली एक्केचाळीशी पार

 आ..बा..बाबा...बा राहुरीच्या तापमानाने केली एक्केचाळीशी पार

राहुरी - विशेष वृत्त



राहुरी तालुक्याचा तापमानाचा पारा आत्तापर्यंत चाळीशी पार केलेला सर्वश्रुत आहे . मात्र सध्या सूर्यनारायण अगदीच कोपल्याचे चित्र असून राहुरी चा पारा 41 पार झाला आहे . 

काल आयएमडी राहुरी येथे सर्वाधिक तापमान 40.6 अंश सेल्सिअस इतके विक्रमी नोंद करण्यात आले आहे . यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान गेले होते . त्याच वेळेस यावर्षी सर्वांना उष्णतेची लाटेजवळ पोहोचणार असल्याचे संकेत मिळत होते .

 एप्रिल महिन्याच्या शेवटच्या दिवशी आज अखेर राहुरीच्या तापमानाने 41 गाठली आहे . सध्या लग्नसराई आणि लोकसभा निवडणुकीचे वातावरण अगदीच तापलेले आहे . त्यातच तापमानाचा पारा वाढल्याने सगळ्यांची लाही लाही होत असल्याचे चित्र आहे .

राहुरी येथील जिल्ह्यातील एकमेव हवामान शास्त्र विभागाचे प्रभारी केंद्र अधिकारी आय.एम.डी. मोहनराव देठे यांनी सांगितले की , गेल्या आठवडाभरापासून तापमानात वाढ होतच आहे . आणखी काही दिवस ही तापमान वाढ अपेक्षित आहे . 

वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी विशेषतः महिला व मुलांनी आपली काळजी घ्यावी , उन्हापासून रक्षण करण्यासाठी पुरेसे उपाय करावे असे आवाहन सतर्क या अभ्यास गटाकडून करण्यात येत आहे .

Post a Comment

0 Comments