Type Here to Get Search Results !

नगर लोकसभा मतदारसंघात विविध पक्षांच्या समर्थकांचा क्लिप वॉर

राहुरी- विशेष वृत्त

37 अहमदनगर लोकसभमतदारसंघासाठी अर्ज भरण्याचा दिवस आठवडाभर असताना सध्या विविध राजकीय पक्षांच्या



समर्थकांकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात क्लिप वॉर  सुरू असून उपहासात्मक आणि विडंबनात्मक अशा व्हिडिओ - ऑडिओ क्लिपची सध्या चलती आहे .

37 अहमदनगर लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी मतदान होणार आहे . त्यासाठी 18 एप्रिल पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे . तत्पूर्वीच सध्या भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून उमेदवार जाहीर झाले आहेत . अन्य पक्षांचे किंवा अपक्षांचेही उमेदवार लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे . नगर जिल्ह्यातील भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्यातील काटेकी टक्कर सर्वश्रृत आहे. नगर जिल्ह्यातील विखे - पवार गटातील शीतयुद्ध देखील अवघ्या राज्याला माहिती आहे .
सध्या सर्वच राजकीय पक्षांच्या समर्थकांकडून यापूर्वी घटित , कथित घटनांचे व्हिडिओ , ऑडिओ क्लिप्स तसेच नेते व कार्यकर्त्यातील संभाषण , आरोप - प्रत्यारोप , टीकाटिप्पणी , धमकी , उखाळ्या पाखळ्या या व अशा काही पद्धतीचे ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे . त्यातील उपहासात्मक व विडंबनात्मक असलेल्या कलात्मक चित्रफितीमुळे याची चर्चा चांगलीच होत आहे .
अभ्यासू आणि जाणकारांच्या मते निवडणूक प्रचार काळामध्ये अशा कथेत विडंबनात्मक व उपहासात्मक ऑडिओ व्हिडिओ क्लिप्स वर देखील आचारसंहिता लागू होते की काय ? असा प्रश्न मात्र विचारला जात आहे .

Post a Comment

0 Comments