शिर्डी लोकसभेला वंचित कडून उत्कर्षा रुपवते उमेदवार
शिर्डी विशेष वृत्त
महाविकास आघाडीकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी काल काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे .
अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत उत्कर्षा रुपवते यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, जिल्हाध्यक्ष विशाल कोळगे हे उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
उत्कर्षा रुपवते शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून इच्छुक होत्या. मात्र, महाविकास आघाडीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे (ठाकरे गट) गेली. त्यामुळे काँग्रेसकडून वारंवार लोकसभेची उमेदवारी नाकारली जात असल्याने उत्कर्षा रुपवते नाराज होत्या. अखेर उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसची साथ सोडली आहे. आता उत्कर्षा रूपवते वंचितकडून शिर्डी लोकसभेची उमेदवारी करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे, महायुतीकडून सदाशिव लोखंडे आणि वंचितने उत्कर्षा रुपवते यांना उमेदवारी जाहीर केल्यास तिरंगी लढत होऊ शकते.
Post a Comment
0 Comments