Type Here to Get Search Results !

राहुरीतील वैभवशाली कामधेनुची भग्नावस्थेकडे वाटचाल ; लोकसभा निवडणुकीत मुद्दा येणार काय

 राहुरी - विशेष वृत्त



एकेकाळी राहुरी तालुक्याची कामधेनु आणि वैभव असलेला राहुरी कारखाना अर्थात डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखाना बंद असल्याने कारखान्यावरील अन्य संस्था व वास्तु या सध्या भग्नावस्थेत पहावयास मिळत आहे .


( युट्यूबवर पहा..... Prasad Maid )

कारखान्यावर आतापर्यंत सर्व प्रकारचे राजकारण झालेले आहे . सध्या लोकसभा निवडणुकीचा धुराळा उठला आहे आणि या निमित्ताने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात डॉ. तनपुरे साखर कारखाना यावर राजकीय आरोपांच्या फैरी उडतील काय ! कारखान्याच्या कामगारांचा प्रश्न ? या निवडणुकीत डोके वर काढेल काय !! याकडे राहुरी तालुक्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे .

सध्या कारखान्यावरील व्हीआयपी गेस्ट हाऊस , डिस्टिलरी ( आसवनी प्रकल्प ) ,पेपर मिल , मंगल कार्यालय , खुले नाट्यगृह , क्लब हाऊस , साखर गोदाम परिसर अगदीच भग्नावस्थेत दिसून येत असल्याने तसेच साखर कारखान्याच्या ऐतिहासिक कर्मचाऱ्यांची चाळ ( वसाहत ) यामुळे सध्या बंद पाडले पडलेल्या कारखान्याचा विषय लोकसभा निवडणुकीत येणार काय ! याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

Post a Comment

0 Comments