Type Here to Get Search Results !

राहुरी शहरातील हे प्रवेशद्वार बनले सर्वांचे आकर्षण

 राहुरी शहरातील हे प्रवेशद्वार बनले सर्वांचे आकर्षण 

राहुरी - विशेष वृत्त




राहुरी शहराच्या प्रवेशद्वाराजवळच माहेरवाशीण तुळजाभवानी मातेची कमान लावल्याने राहुरी शहराच्या वैभवात भर पडणार आहे .

नगर मनमाड रस्त्यावरील कुलकर्णी हॉस्पिटल शेजारी शहराच्या प्रवेशद्वारावर राहुरी नगरपालिकेने स्वागत कमान लावली आहे . गेले अनेक दिवस त्याचे काम सुरू होते . या कमानीवर भव्य असे डिजिटल कुलस्वामिनी आई तुळजाभवानी प्रवेशद्वार अशी भव्य कमान सुशोभीकरणासह लावण्यात आली आहे .

कालपासून ही डिजिटल असणारी भवानी मातेची कमान राहुरी शहरवासीयांसह नगर मनमाड रस्त्यावरील नागरिकांचे व पर्यटकांचे आकर्षण बनले आहे .

काल आणि आज या ठिकाणी अनेक नागरिक सेल्फी काढत असल्याचे चित्र दिसून येत होते . राहुरी शहराच्या सुशोभीकरणासाठी राहुरी नगरपालिकेने ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसाद तनपुरे , बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे. डॉक्टर सौ उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी नगरपालिके शेजारी एक स्वागत कमान (वेस ) , पाण्याच्या टाकी जवळ एक तर नगर मनमाड रस्त्यावर कुलकर्णी हॉस्पिटल शेजारील कमान अशा तीन कमानींचे काम सुरू होते .

आता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेची कमान सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे , तर अन्य कमानींचे काम कधी होणार ? असा प्रश्न देखील राहुरी शहरवासीयांकडून संबंधित प्रशासनाकडे केला जात आहे .


Post a Comment

0 Comments