Type Here to Get Search Results !

मुळा धरणाच्या उजव्या कालव्याच आवर्तन सायंकाळी सोडणार

 राहुरी - विशेष वृत्त


मुळा धरणातून उजवा कालव्यासाठी आज सायंकाळी शेती सिंचनाचे एकमेव आवर्तन सोडण्यात येणार आहे. यामुळे राहुरीसह नेवासा ,शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील शेतीला लाभ होणार आहे .

मुळा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना यंदाची वर्ष संकटाचे जात आहे . यंदा पाऊस कमी झाल्याने धरण भरले नाही , तसेच जायकवाडी धरणही न भरल्याने मुळा धरणातून दोन टीएमसी पाणी देण्याची नामुष्की ओढवली गेली . परिणामी मुळा धरणाच्या दोन्ही कालव्यांवरील शेती सिंचनावर त्याचा परिणाम झाला .

 नुकतेच डाव्या कालव्याचे आवर्तन संपले . धरणाच्या उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन म्हणजेच एकमेव आवर्तन आज सायंकाळी सोडले जाणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली . सुमारे महिनाभर चालणाऱ्या या आवर्तनामध्ये साडेतीन टीएमसी पाणी खर्च होणार आहे . आणि उन्हाळ्यात मुळा धरणाच्या उजव्या कालव्याची आवर्तन सुटले जाणार असल्याने राहुरी तालुक्यासह नेवासा पाथर्डी शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यात समाधानाचे वातावरण पसरले आहे .

Post a Comment

0 Comments