निळवंडे कॅनॉलच्या शिल्लक एक टीएमसी पाण्याच्या रोटेशनसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला इशारा
राहुरी शहर प्रतिनिधी २८
निळवंडे धरणातून उजव्या कालव्यातून राहुरी तालुक्याच्या वाट्याचे शिल्लक असलेले १ टी एम सी पाणी १ मे २०२४पर्यंत न पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन करणार करण्यात येईल असा इशारा जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता शेटे यांना मोबाईलवरून आ. प्राजक्त तनपुरे यांनी तहसीलदार नामदेव पाटील यांना दिला.
निळवंडे धरणामधून निळवंडे उजव्या कालव्याला पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होऊन सदर पाणी कालव्याचे कामे पूर्ण होऊन २५ एप्रिल २०२४ रोजी सोडण्यात येईल असे सांगूनही सदर पाणी आज २८ तारखेपर्यंत सोडण्यात न आल्याने आज सकाळी निळवंडे उजव्या कालव्याचे लाभधारक शेतकरी आक्रमक होऊन आज तहसील कार्यालय येथे आले होते यावेळी माजी राज्य मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे हे आले होते त्यांनी प्रथम तहसीलदार नामदेव पाटील यांचेशी चर्चा करीत शेतकऱ्यांनी आपली गाऱ्हाणी मांडली यावेळी तहसीलदार पाटील यांनी निळवंडे धरणाचे कार्यकारी अभियंता हापसे यांचेशी मोबाईलवर चर्चा केली यावेळी आमदार तनपुरे यांचेशी व्यवस्थित उत्तरे न दिल्याने त्यांनी निळवंडे धरणाचे अधीक्षक अभियंता शेटे यांचेशी चर्चा करून कालवा सल्लागार समितीमध्ये पालक मंत्री यांचे बरोबर झालेल्या निर्णय दोन्ही अधिकारी यांना सांगूनही त्याबाबत कुठलीही कार्यवाई शेतकऱ्यांना शब्द देऊनही २५ एप्रिल २०२४ होऊन पर्यंत पाणी सुटण्याचे चिन्ह दिसेनात म्हणून आज २८ तारखेला निळवंडे उजवा कालव्याचे लाभधारक शेतकरी आले आहे.निळवंडे धरणातुन कालव्याला पाणी न सोडता प्रवरा नदीपात्रात पाणी सोडल्याने लाभधारक शेतकरी अधिक आक्रमक होत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्त्वाखाली कचेरीवर धडकले होत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार या कालव्याला तात्काळ पाणी सोडण्यात यावे अन्यथा येणाऱ्या काळात तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
तालुक्यातुन उत्तरेतील भागासाठी लाभदायक समजल्या जाणाऱ्या निळवंडे उजव्या कालव्यासाठी १.५ टीएमसी पाणी राखीव करण्यात आले होते. पैकी अर्धा टीएमसी पाणी हे चाचणी साठी यापूर्वी सोडण्यात आले होते व कालव्यांचा लिकेज चेक करण्यात आली होती उर्वरित एक टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतला असून देखील अद्याप पाणी सुटत नसल्याने यामागे काही राजकीय षडयंञ असल्याचा संशय आ.तनपुरेंनी व्यक्त केला आहे. उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असल्याने तात्काळ हे पाणी सोडणे अत्यंत महत्त्वाचं होतं मात्र हे पाणी सोडलं गेलं नसल्याने लाभधारक शेतकऱ्यांमध्ये तीव्र रोष असल्याने आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी राहुरी तहसीलवर लाभधारक शेतकऱ्यांनी मोर्चा नेला, तहसीलदार नामदेव पाटील यांच्याशी संवाद साधून आपल्या व्यथा मांडल्या. पाटबंधारे विभागाने तात्काळ या कालव्याला पाणी सोडण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरापाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिला आहे.
आ.प्राजक्त तनपुरे
यावेळी निळवंडे लाभक्षेत्रातील निभेंरे तुळापूर कानडगाव तांदूळनेर, वडनेर, कनगर, चिंचवहिरे येथील शेतकरीकिरण गव्हाणे,सुयोग नालकर, सुखदेव बलमे,रघुदादा मुसमाडे,पप्पू मुसमाडे, सुहास उऱ्हे, सर्जेराव खेमनर,अण्णासाहेब खेमनर, भाऊसाहेब आडभाई,सुधाकर मुसमाडे, गोविंद वरघुडे, अनिल नालकर, साहेबराव शिगोटे, पप्पू मालवदे, डॉ रवींद्र गागरे अनिल नालकर आदी उपस्तिथ होते .
Post a Comment
0 Comments