आठ वर्षापासून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारे सख्खा मामे भाऊ व मावस भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल
आरोपी मामेभाऊ अटक ; ५ दिवस पोलीस कस्टडी
राहुरी - वृत्त सेवा
सन 2016 पासून ते एप्रिल 2024 पर्यंत राहुरी तालुक्यातील पीडित अल्पवयीन मुलीच्या घरी दिवाळीच्या सुट्टीत उन्हाळ्याच्या सुट्टीत तिचा सख्खा मामेभाऊ ऋषिकेश पांडुरंग धोंडे वय पंचवीस वर्ष व तिचा सखा मावस भाऊ सतीश टकले यांनी मिळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले .
तसेच मोबाईल मध्ये व्हिडिओ शूटिंग करून तिला वेळोवेळी ब्लॅकमेल केले व गावठी पिस्टलचा दाखवून तिच्यावर जबरी करून मामेभाऊ ऋषिकेश धोंडे यांनी आळंदी पुणे येथे जाऊन तिच्याशी जबरीने लग्न केले त्यानंतर तिला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून राहुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर I 512/2024 भादवी कलम 376,376(2) (n)376(D)366,354,307,324,323,504,506,34, सह Pocso अधि. कलम 8 11 12 प्रमाणे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता .
त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास पीएसआय खोंडे हे करत होते. सदर तपासात आरोपी क्र.1) ऋषिकेश पांडुरंग धोंडे वय पंचवीस वर्ष याला बीड जिल्ह्यातून शिताफिने ताव्यात घेण्यात आले आहे व त्यास नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींना *माननीय न्यायालय यांनी पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे .* सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. राकेश ओला सो,, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. कलुबरमे सो, मा.उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. बसवराज शिवपुजे सो, यांचे मार्गदर्शना खाली प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोसई सी आर खोंडे, सहाय्यक फौजदार भराटे ,पोहेकॉ/ पालवे पोहेकॉ/ सुरज गायकवाड, पोहेकॉ/ राहुल यादव, पो.कॉ/ प्रमोद ढाकणे, पो.कॉ/ सचिन ताजने, पो.कॉ/ नदीम पो.कॉ/ इफ्तेखार सय्यद पो.कॉ/ अंकुश भोसले, पो.कॉ/ सतीश कुराडे, पो.कॉ/ गोवर्धन कदम, गोपनीय अशोक शिंदे, पोलीस नाईक सचिन धानंद, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर यांनी केली आहे.
Post a Comment
0 Comments