वाघाच्या हल्ल्यात बचावले वाघाच्या आखाड्यावरील "वाघ"
चार चाकी वाहनाच्या दोन पलट्या
राहुरी - विशेष वृत्त ( विनित धसाळ )
तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील उद्योजक गणेश वाघ हे चार चाकी वाहनातून घरी जात असताना अचानक बिबट्याने वाहनावर हल्ला केल्याने बिबट्याला वाहनाची जोराची धडक बसली त्यामुळे बिबट्या धूम ठोकून पळून गेला मात्र गाडीने दोन-तीन पलट्या घेतल्याची घटना घडली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की दोन दिवसांपूर्वी राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील युवा उद्योजक गणेश पोपट वाघ हे शुक्रवार दि.२६ एप्रिल रोजी आपले काम आटोपून रात्रीच्या वेळी ११.०० वाजता घरी जात असताना राहुरी ते वाघाचा आखाडा यादरम्यान अचानक बिबट्याने वाहनावर हल्ला केला परंतु वाहनाला वेद असल्याने बिबट्याला धडक बसली त्यामुळे बिबट्या धूम ठोकून पळून गेला परंतु अचानक घडलेल्या प्रसंगामुळे गणेश वाघ यांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांच्या चार चाकी या वाहनाने दोन पलट्या घेतल्या यामध्ये त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली परंतु वाहणाने दोन पलट्या घेऊनही सुदैवाने काही झाले नाही घटना घडल्यानंतर वाघाचा आखाडा येथील माजी उपसरपंच किशोर दौंड व उत्तम वाघ यांनी त्वरित गणेश वाघ यांना वाहनातून बाहेर काढले व सुखरूप घरी पोहोच केले. राहुरी तालुक्याच्या काही गावांमध्ये विशेषता वाघाचा आखाडा राहुरी स्टेशन तांदुळवाडी कोंढवड आरडगाव मुसळवाडी आदी भागामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्याचे वास्तव्य असून अनेक वेळा शेतकऱ्यांवर हल्ले करण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे वनविभागाने या प्रकाराकडे लक्ष घालून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ व शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
Post a Comment
0 Comments