देवळाली प्रवरा येथील श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यांची यात्रा चार एप्रिल पासून
राहुरी- विशेष वृत्त
देवळाली प्रवरातील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज यांचा यात्रा उत्सव सालाबाद प्रमाणे गुरुवार ४ एप्रिल ते सोमवार दि. ८ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आला असल्याची महिती यात्रा कमिटीचे वतीने अध्यक्ष डॉ. विश्वास पाटील यांनी दिली .
गुरुवार दि.४ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता पवित्र गंगाजल आणण्यासाठी भाविकांचे श्री क्षेत्र पुणंताब्याकडे प्रयाण होणार आहे. ल शुक्रवार दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजता शिवव्याख्याते समाजप्रबोधनकार ज्ञानेश्वर महाराज पठाडे यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. शनिवार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता ढोलताशांच्या गजरात श्री क्षेत्र.पुणंताबा येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाची शहरातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी ४ ते ९ पालखी मिरवणूक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . हा सोहळा महाराजांचे वंशज संजय बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानापासून निघणार असून पालखी पूजन सायंकाळी ६. ३० वाजता महंत उध्दव महाराज मंडलिक यांचे हस्ते होणार आहे. या मिरवणूकीत राज्यातील नाशिक, वैजापुर, बारामती व देवळाली प्रवरा येथिल नामांकित बँन्ड पथक सहभागी होऊन आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. रात्री ९.३० वाजता शोभेच्या दारुची भव्य आतिषबाजीचे आयोजन करण्यात आले आहे . या मध्ये संगमनेर, वांबोरी, बेलापूर येथील नामांकित रोषणाईकार आपल्या कलेचे कसब दाखविणार आहेत. रविवार दि. ७ एप्रिल रोजी ४.३० वाजता कुस्त्याचा जंगी हंगाम्यांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री ९.३० वाजता मोफत लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे .सोमवार दि. ८ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता अहो नादचं खुळा ! हा सदाबहार लावण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . तरी देवळाली प्रवरा पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रा उत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रा उत्सव कमिटीने केले आहे.
Post a Comment
0 Comments