नगर जिल्ह्यातील या आमदाराचा व्हिडिओ चांगलाच होतोय व्हायरल
राहुरी - विशेष वृत्त
नगर जिल्ह्यातील आमदार सत्यजित तांबे यांचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय . एका कार्यक्रमात आमदार तांबे यांनी मतदारांनी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे , यासाठी एका कार्यक्रमात उपस्थितांना प्रबोधन केले आहे .
या व्हिडिओमध्ये ते एका मित्राला उद्देशून म्हणतात की , लोक मतदान करताना निरुत्साह दाखवतात . मतदान न करता गावाला जातात , आमदार खासदारांकडे आपले काही काम नाही , आपल्याला काय करायचे , असे लोक म्हणत मतदान करत नाहीत .मग आमदार तांबे म्हणाले की , मी त्या मित्राला समजावले . आपण जातो ते रस्ते , राहतो ती घर , यांचे दर सरकार ठरवते . ठिकठिकाणी हवा , पाणी , एवढेच नव्हे तर प्रदूषण होणार नाही याबाबत त्याची सरकार निर्णय घेते . मोठ्या प्रमाणात सर्वच काम सरकार करते . त्यामुळे हे सरकार कोणते आणायचे हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला असतो . त्यासाठी जास्तीत जास्त मतदान करावे , असं असे आमदार तांबे यांनी या व्हिडिओतील प्रबोधनात म्हटले आहे .
सध्या लोकसभा निवडणुकीची देशभरात रणधुमाळी सुरू आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासन निर्विघ्नपणे निवडणुका पार पाडण्यासाठी ऑटोकाट प्रयत्न करत आहे . पहिल्या टप्प्यात शहरी भागात कमी मतदान झाले , मात्र अशांत , दहशतीखालील व नक्षली भागात मात्र मोठ्या प्रमाणात मतदान झाले . असे असताना अनेक ठिकाणी मतदारांमध्ये निरुत्साह दिसून येतो . शिकले सवरलेले देखील लोक मतदान करत नाही . लोकशाहीत मतदान हे पवित्र मानले जाते , त्यामुळे अधिकाधिक मतदान व्हावे , यासाठी आमदार सत्यजित तांबे यांचा हा प्रबोधनात्मक व्हिडिओ सध्याच्या काळात चांगलाच लोकप्रिय होत आहे .
Post a Comment
0 Comments