राहुरी - विशेष वृत्त
मी जरी सध्या विरोधी पक्षाचा आमदार असलो तर केवळ सहा महिने , सहा महिन्यानंतर मी विरोधी पक्षाचा आमदार नसेल . राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येईल , असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकसभेचे उमेदवार आमदार निलेश लंके यांच्या राहुरी तालुक्यातील स्वाभिमान जनसंवाद यात्रेमध्ये स्टार प्रचारक आमदार प्राजक्त तनपुरे बोलत होते.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार निलेश लंके यांची राहुरी तालुक्यामध्ये स्वाभिमान जनसंवाद यात्रा सध्या सुरू आहे. राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा, मल्हारवाडी, घोरपडवाडी, चिंचाळे, म्हैसगाव, कानडगाव, निंभेरे, तांभेरे , सोनगाव, सात्रळ आदी परिसरामध्ये निलेश लंके सह राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. दरम्यान ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार लंके व आमदार प्राजक्त तनपुरे यांनी नागरिकांशी चर्चा करत संवाद साधला . या स्वाभिमान जनसंवाद यात्रेला राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे .
Post a Comment
0 Comments