Type Here to Get Search Results !

टाकळीच्या अवलियाचा वैष्णोदेवीला मोटरसायकलवर प्रवास


 टाकळीच्या अवलियाचा वैष्णोदेवीला मोटरसायकलवर प्रवास

राहुरी - विशेष वृत्त




राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रामदास भिमराज जाधव व सतीश संदीप मोरे या दोघांनी टाकळीमिया ते वैष्णोदेवी हा 5 हजार 500 किलोमीटरचा प्रवास 13 दिवसांत पूर्ण करून सुखरूप परतले. त्यांच्या या उपक्रमाचे गाव व तालुक्यातून कौतुक केले जात आहे.


ही प्रेरणा आपणांस कुठून मिळाली यावर रामदास जाधव म्हणाले, माझे वडील भिमराज जाधव यांनी 1971 , 1982 व 1985 या वर्षी काशी, वाराणसी, ऋषिकेश, वैष्णोदेवी , पुष्कर या तिर्थस्थानी सायकलवरुन प्रवास केलेला आहे. रामदास जाधव हे देखील गेल्या 30 - 32 वर्षांपासून दरवर्षी इतर साधनांनी वैष्णोदेवी दर्शनास जात आहे. आपले वडील सायकलवरुन जात याचीच प्रेरणा घेऊन मोटारसायकलवरून जायचे हे ध्येय पक्के केले. माझे मित्र सतीश मोरे यांना याची कल्पना दिली , त्यानेही

उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 


ठरल्याप्रमाणे 5 एप्रिलला सकाळी निघून दररोज सुमारे 300 ते 400किलोमीटर प्रवास करत शिर्डी, मालेगाव, धुळे, इंदूर, देवास ग्वाल्हेर, आग्रा, नोएडा, दिल्ली ,सोनिपत, पानिपत, अंबाला, पठाणकोट, जम्मू व वैष्णवदेवी येथे पोहोचले . वैष्णव देवीचे दर्शन घेताना वेगळीच अनुभूती जाणवली. त्यानंतर आम्ही परतीचा मार्ग सुरू केला. येताना पठाणकोट, वाघाबॉर्डर, अमृतसर, भटिंडा, फरिदाबाद, हनुमानगढी, बिकानेर, जुनागड, जैसलमेर, नागौर, अजमेर, पुष्कर नसिराबाद, भिलवाडा, चितोडगड, कोटा, रतलाम, शेंदवा, शिरपूर, धुळे व शिर्डी टाकळीमिया हा सुमारे साडेपाच हजार किलोमीटर प्रवास करून 17 एप्रिलला रात्री घरी पोहचले .


या प्रवासादरम्यान अनुभव कथन करताना जाधव म्हणाले की ,मोटारसायकल असल्याने शहरे तसेच काही लहान गावे लागली. प्रत्येक राज्यांच्या चालीरीती माणसांचे स्वभाव त्यांचे बोलणे हे लक्षात आले. रस्त्याने अनेकजण भेटले. त्यांनी आपुलकी दाखवून काहींनी जेवण दिले तर काहीनी गाडीत पेट्रोलसाठी पैसेही दिले . तर राजस्थान हा गरीब प्रांत असला तरीही येथील माणसांमध्ये फारच आपुलकी व प्रेम भावना दिसून आली. अशा या अवलिया रामदास भाऊ जात होती चर्चा सर्वत्र सुरू आहे

Post a Comment

0 Comments