Type Here to Get Search Results !

मतदानासाठी राहुरी शहरात ही 22 मतदान केंद्रे

मतदानासाठी राहुरी शहरात ही 22 मतदान केंद्रे

राहुरी - विशेष वृत्त



उद्या सोमवार 13 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी वैशिष्ट्यपूर्ण अशी महिला , तरुण , दिव्यांग , मॉडेल , ही मतदान केंद्रे राहुरी शहरातच असल्याने ही मतदान केंद्रे कशी असतील याची चर्चा राहुरी शहरात सुरू आहे .



37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील 223 राहुरी विधानसभा मतदारसंघात एकूण 360 मतदान केंद्रे आहेत . त्यातील राहुरी तालुक्यात सर्वाधिक 178 मतदान केंद्रे आहेत. राहुरी शहर व परिसरात 32 मतदान केंद्रे असून शहरातील सौ भागीरथीबाई तनपुरे माध्यमिक विद्यालय (चार मतदान केंद्रे ) , कै. ल.रा.बिहाणी विद्यामंदिर प्रशाला (सहा मतदान केंद्रे) , प्रगती विद्यालय (आठ मतदान केंद्र ) आणि नूतन मराठी शाळा (चार मतदान केंद्र ) अशी ही मतदान केंद्रे आहेत . 



सौ भागीरथीबाई तनपुरे विद्यालयात एक मतदान केंद्र पूर्णपणे महिला संचलित असेल , 




तर जवळच असणाऱ्या नूतन मराठी शाळेतील एक मतदान केंद्र दिव्यांगंसाठी सुविधा असणारे असेल,  शहरातील प्रगती विद्यालयातील एक मतदान केंद्र आदर्श मतदान केंद्र तर अन्य एक युवा कर्मचारी संचलित मतदान केंद्र असेल .

राहुरी शहरात साधारणतः 32 हजार 752 इतके मतदार संख्या आहे . याशिवाय पंचक्रोशीतील येवले आखाडा , जोगेश्वरी आखाडा ,वराळे वस्ती ,तनपुरे वाडी , पिंपळाचा मळा , आदी ठिकाणी मतदान केंद्रे असतील. 

विधानसभा मतदार संघात मतदान साहित्य व कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी 42 एसटी बसेस , 12 मिनी बसेस , अकरा जीप , 9 क्रूजर अशी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे .

प्रत्येक मतदान केंद्रात एक कंट्रोल युनिट. दोन बॅलेट युनिट , एक व्हीव्हीपॅट यंत्र असतील. 307 मतदान केंद्रांसाठी प्रत्येकी पाच जन असे 341 पथके तयार करण्यात आली असून 1 हजार 535 मतदान अधिकारी , कर्मचारी व अतिरिक्त 170 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे .

 उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी शाहूराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीतील निवडणूक प्रशासन उद्याच्या मतदानासाठी सज्ज झाले आहेत .

Post a Comment

0 Comments