Type Here to Get Search Results !

लोकसभा निवडणुक - मतदान पथकाचे दुसरे प्रशिक्षण संपन्न : 23 कर्मचारी गैरहजर

लोकसभा निवडणुक - मतदान पथकाचे दुसरे प्रशिक्षण संपन्न : 23 कर्मचारी गैरहजर

राहुरी -  विशेष वृत्त



 लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ करिता राहुरी मतदारसंघामध्ये दि. ४.५.२०२४ व ५.५.२०२४ रोजी मतदान पथकांचे दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. 



हे प्रशिक्षण महात्मा फुले कृषी विद्यापीठातील नानासाहेब पवार सभागृह व सावित्रीबाई फुले विद्यालय येथे दोन सत्रात आयोजित करण्यात आले होते.

प्रथमतः निवडणूक विषयक प्रक्रियेचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी निवडणूक प्रक्रियेबाबत खास तयार करण्यात आलेल्या प्रशिक्षण व्हिडीओचा व पॉवरपॉईंट सादरीकरणाचा प्रभावीपणे वापर करण्यात आला.  त्यानंतर प्रत्येक मतदान अधिकाऱ्यास मतदान यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण देण्यात आले व सर्व शंकांचे निरसन करण्यात आले.

सदर प्रशिक्षणास उपस्थित राहिलेल्या अधिकाऱ्यांचा स्वतंत्र व्हाट्स अँप ग्रुप तयार करण्यात आला असून त्यावर प्रशिक्षण विषयक साहित्य व व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 

प्रशिक्षणाच्यावेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील मतदार असलेल्या अधिकाऱ्यांना 'निवडणूक कार्य प्रमाणपत्र' (EDC) वाटप करण्यात आले. तर या मतदारसंघाबाहेरील मतदार असलेल्या अधिकाऱ्यांना 'मतदार सुलभता केंद्रा'मध्ये (Facilitation Centre) टपाली मतदानाद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. प्रशिक्षणाच्या ठिकाणी वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका नेमण्यात आली होती.


दोन्ही दिवशी मिळून प्रशिक्षणाला एकूण 1348 कर्मचारी हजर तर 

23 जण गैरहजर होते.


सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाकरिता राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार पूनम दंडीले, संध्या दळवी, विशाल सदनापूर व सचिन औटी यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी सर्व सेक्टर अधिकारी, तहसील कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

०००

Post a Comment

0 Comments