मुळा प्रवरा पात्रात प्रचंड वाळू उपसा विरोधात 24 मे ला आंदोलनाचा इशारा
राहुरी / राहता - विशेष वृत्त
जिल्ह्यातील राहता, राहुरी, संगमनेर व श्रीरामपूर तालुक्यांच्या हद्दीत शासनाच्या वतीने ठेकेदाराच्या माध्यमातून प्रचंड वाळू उपसा चालू आहे. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक : गौ- १० / १२२२/प्र. क्र.८२ / ख-१ दिनांक १९/४२०२३ नुसार हा प्रचंड वाळू उपसा सुरू आहे . या वाळू उपशाच्या विरोधात
नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सविस्तर निवेदन मे.प्रांत साहेब शिर्डी, मे. तहसीलदार साहेब राहता, मे. तहसीलदार साहेब राहुरी यांना दिलेले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की , शासनाचा हा निर्णय प्रवरा परिसर पूर्ण उजाड करणारा आहे. या निर्णयासाठी पूर नियंत्रणाची भीती दाखवण्यात आलेली आहे. परंतु पूरनियंत्रण आणि या वाळू उपशाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. नदी खोलीकरणाच्या बाबतीत सुद्धा अशाच प्रकारचा मुद्दा शासनाच्या वतीने मांडलेला आहे. तोही तदन खोटाच आहे. या खोली करणामुळे काठाच्या बाहेर, काठापासून दूर असलेल्या विहिरींचे पुनर्भरण होण्या ऐवजी हे पाणी नदीकडे खेचले जाणार आहे. पर्यायाने दूरच्या शेतातील विहिरीसुद्धा कोरड्या पडणार आहेत.किंवा त्यांच्या पाण्याची पातळी खलावणार आहे.
या परिसरात के. टी. वेयर्सचे बंधारे आहेत आश्वी,दाढ, रामपूर आणि कोल्हारचा बंधारा असे अनेक बंधारे या परिसरात आहेत. बंधार्यांना नक्कीच धोका होणार आहे.
बंधाऱ्यांप्रमाणेच या नदीपात्रात अनेक शेतकऱ्यांच्या विहिरींचे सिमेंटचे कडे आहेत. हे कडे सुद्धा कलंडण्याची किंवा ढासळण्याची शक्यता आहे. किंवा आजच त्याच्या भोवतालची वाळू कमी झाल्यामुळे ते ढसाळतीलच अशी परिस्थिती झाली आहे. खरे तर वाळू विक्री चे शासनाचे धोरण महाराष्ट्रात फसलेलं आहे. परंतु त्या फसण्याची भरपाई या ठिकाणी प्रवरा परिसरातच फक्त केली जात आहे.
हा वाळू उपसा पाण्याअडून केला जात आहे. त्यामुळे मोजमापाचा काही पत्ता नाही. काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीच्या बाजूला नदीमध्ये पीव्हीसी पाईप टाकून मोजमाप घेण्याचा प्रयत्न केला तर ही खड्डे चक्क तीस फुटापेक्षा जास्त असावेत अशी परिस्थिती आहे.
याच संदर्भात आणखी महत्त्वाचा मुद्दा की, मंत्री महोदयांनी स्वतःचा मतदार संघ किंवा तालुका किंवा स्वतःच्या अंकित राहत्याच्या तहसीलदाराकडून हा निर्णय व त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे.म्हणजे नदी परिसर स्वमालकीचा आहे या मजासखोरीतून हे सर्व सुरू आहे. वाळू उपसा हा राहाता तालुक्यात आहे म्हणून दाखवण्यात येत असले तरीसुद्धा पाण्याअडून ही वाळू चक्क राहुरी तालुक्याच्या बाजूने सुद्धा ढासळत आहे. पाण्यातल्या पाण्यात ढासाळली जाणारी वाळू केवळ राहाता तालुक्यतील नव्हे तर राहुरी तालुक्यातील काठाच्या बाजूने सुद्धा प्रचंड मोठा वाळू उपसा होत आहे. या आणि अशा कितीतरी बाबी या वाळूच्या निमित्ताने निदर्शनाला येत आहेत की ज्यांचा निषेधच केला पाहिजे. मात्र केवळ निषेध करून न थांबता आम्ही या वाळू उपशाला तीव्र विरोध करीत आहोत ! हा वाळू उपसा त्वरित थांबलाच पाहिजे म्हणून मागणी करीत आहोत !!
वाळू उपशाचा प्रश्न दूध उत्पादक उध्वस्त झालेलाच आहे . साखर आणि दूध यात शेतकऱ्यांना नागवल्यानंतर आता संबंधित नेते शेतकऱ्यांची जीवनदायीनी, अमृतवाहिनी प्रवरामायला ओरबाडायला आणि पर्यावरणही उध्वस्त करायला निघाले आहेत.
त्याचबरोबर परिसरातील शेती शेतकरी व्यापार उदीम, बाजारपेठ सुद्धा उद्ध्वस्त करायला निघाले आहेत.
म्हणूनच त्या विरोधात आम्ही शुक्रवार दि.24 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण आणि धरणे आंदोलन करणार आहोत. निवेदनावर अरुण कडू ,भास्कर फणसे ,भास्कर विष्णुपंत दिघे, बापूसाहेब दिघे , आदिनाथ दिघे ,अरुण सूर्यभान दिघे ,सागर पंडितराव कडू ,गणेश सोपानराव कडू ,नरेंद्र चंद्रभान कडू , दिलीप ,शामराव कडू ,सूर्यभान डुकरे आदींच्या सह्या आहेत.
Post a Comment
0 Comments