Type Here to Get Search Results !

लोकसभेसाठी राहुरीत दुपारी एक पर्यंत 29 टक्के मतदान

लोकसभेसाठी राहुरीत दुपारी एक पर्यंत 29 टक्के मतदान



 राहुरी - विशेष वृत्त

लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी राहुरी विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत 29 टक्के मतदान झाले आहे .

पुरुषांपेक्षा महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी 10 टक्क्यांनी कमी दिसून येत आहे . आज सकाळपासून राहुरी शहरासह राहुरी विधानसभा मतदारसंघातील 307 मतदान केंद्रांवर शांततेने मतदान सुरू झाले .



सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार , दुपारी एक वाजेपर्यंत 53 हजार 873 पुरुष मतदार तर 36 हजार 558 महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला . 


दुपारी एक वाजेपर्यंत एकूण 90 हजार 431 मतदारांनी मतदान केले . 29 टक्के इतके मतदान शांततेने पार पडले .

दुपारी अनेक ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता . राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे , माजी खासदार प्रसाद तनपुरे व तनपुरे कुटुंबीयांनी शहरातील प्रगती विद्यालयातील मतदान केंद्रावर एकत्रितरित्या येऊन मतदान केले .

Post a Comment

0 Comments