पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 मे रोजी कन्याकुमारीला जाणार : ध्यानधारणा करणार
सतर्क खबरबात जिल्ह्याची - विशेष वृत्त
३० मे रोजी लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील प्रचार संपताच होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३० मे ते १ जूनपर्यंत कन्याकुमारीला भेट देऊन ध्यानधारणा करणार आहेत .
कन्याकुमारीच्या समुद्रकिनारी असलेल्या विवेकानंद रॉक मेमोरियलला भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे याठिकाणी दोन दिवस ध्यानधारणा करणार आहेत. याचठिकाणी स्वामी विवेकानंद यांनीही ध्यानधारणा केली होती. .
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 चे लोकसभा निवडणूक होतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले प्रतापगड येथे भेट दिली होती . त्यानंतर 2019 चे लोकसभा निवडणूक प्रचार संपताच पवित्र अशा चारधाम पैकी श्री केदारनाथ धाम येथे एका गुंफेमध्ये ध्यानधारणा केले होते .
आता 2024 लोकसभा निवडणुकीच्या 57 जागांचे मतदान संपताच पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे भेट देऊन ध्यानधारणा करणार असल्याचे वृत्त सोशल मीडियावर झळकले आहे .
दरम्यान विवेकानंद केंद्र कन्याकुमारी चे शिल्पकार म्हणून ज्येष्ठ प्रचारक स्वर्गीय एकनाथजी रानडे यांच्या कार्याविषयी आता चर्चा सुरू झाली आहे.
Post a Comment
0 Comments