Type Here to Get Search Results !

विजेचा शॉक लागलेल्या वानरास मिळाले जीवदान


वीजेचा शाॅक लागलेल्या वानरास कदम प्रतिष्ठानच्या धावपळीमुळे मिळाले जीवदान

राहुरी  - विशेष वृत्त



देवळाली प्रवरा ता.राहुरी येथील आण्णासाहेब कदम पाटील शेती व ग्रामविकास प्रतिष्ठानच्या लक्ष्मण बागेजवळील स्ट्रीट लाईटच्या वीजवाहक तारांमुळे शाॅक लागून बेशुद्ध होऊन पडलेल्या वानराच्या पिलाला प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी वेळीच केलेल्या धावपळीमुळे जीवदान मिळाले आहे.



गेल्या काही दिवसांपासून वारांची एक टोळी या परिसरात तळ ठोकून आहे.आज सकाळी एका वानर पिल्लाने रस्त्यालगत असलेल्या वीजवाहक तारांवर झेप घेताच त्याला विजेचा जोराचा धक्का लागून ते जमिनीवर कोसळले.ही घटना पहात असलेले प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी तात्काळ धाव घेऊन चिकित्सा केली असता ते वानर जखमी होऊन बेशुद्ध पडले असल्याचे लक्षात आले.प्रतिष्ठाणचे पूर्ण वेळ कार्यकर्ते भूषण महाजन, कृष्णा देठे, ऋषिकेश उंडे यांनी तात्काळ प्रतिष्ठानच्या स्वास्थ्य सेवा वाहनातून देवळालीतील पशू चिकित्सा केंद्रात घेऊन गेले.तिथे पशूवैद्य भंवर यांनी वानरावर प्रथमोपचार करून राहुरी येथील पशुवैद्यकीय केंद्रात घेऊन जाण्यास सांगितले.राहुरी येथे वानरावर वन अधिकारी वाघचौरे व पशूवैद्य पालवे यांनी चांगले उपचार करून त्यास जीवदान दिले.शुद्धीवर येताच हे वानर आपल्या स्वभावानुसार वानर लिला करीत जवळच्या झाडावर जाऊन आरामात विसावले.

प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या धावपळीबद्दल पशू व वन अधिकाऱ्यांनी प्रशंसा केली तर वानरास जीवदान देणाऱ्या पशूवैद्यांचे व वन अधिकाऱ्यांचे प्रतिष्ठानने आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments