Type Here to Get Search Results !

राहुरीकरांना सेवा देणारा राजू ॲम्बुलन्सवाला आपल्यातून गेला

राहुरीकरांना सेवा देणारा राजू ॲम्बुलन्सवाला आपल्यातून गेला



राहुरी - विशेष वृत्त

कोणताही अपघात अथवा पेशंट हॉस्पिटलला नेण्यासाठी उपलब्ध असणारा राजू तनपुरे आता आपल्याला दिसणार नाही.  राजेंद्र दत्तात्रय तनपुरे तथा ॲम्बुलन्सवाले राजू तनपुरे यांचे रविवारी मध्यरात्री दुखद निधन झाले.

 राहुरीकरांमधून आज राजू ॲम्बुलन्सवाले स्वर्गवासी झाले . राजेंद्र दत्तात्रय तनपुरे तथा  राजू तनपुरे , तनपुरेवाडी , राहुरी . वीस वर्षांपूर्वी या ध्येयवेढ्या तरुणाने ॲम्बुलन्सच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी विडा उचलला आणि मारुती व्हॅन च्या माध्यमातून 24 तास ॲम्बुलन्स ची सेवा सुरू केली . विविध संस्था , संघटनांच्या माध्यमातून या राजूला सहकार्य मिळत गेले .



नगर मनमाड रस्त्यावर त्या काळात मोठ्या प्रमाणात अपघात घडत असे.  एका फोनवर राजू ॲम्बुलन्सवाला अनेक ठिकाणी घटनास्थळी हजर होत. तात्काळ संबंधित पेशंटला रुग्णालयापर्यंत जाण्यासाठी कसरत करत असे . राजू तनपुरे यांनी अनेक दिव्यांग पेशंट अपघातातील पेशंट एवढेच नव्हे तर अर्जंट मध्ये डिलिव्हरीचे पेशंटही वाचविले आहेत . कोरोना काळात राजू तनपुरे यांनी मोठे काम केले आहे . राजू तनपुरे यांचे रविवारी मध्यरात्री दुखद निधन झाले . 

राहुरी तालुक्यातील ॲम्बुलन्स सुविधा देणाऱ्या सर्व ॲम्बुलन्स चालक मालकांनी राजू तनपुरे यांना वेगळ्या प्रकारे श्रद्धांजली वाहिली . तनपुरे यांच्यावर राहुरीत दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले . ॲम्बुलन्सवाले राजू भाऊ तनपुरे कायम राहुरीकर यांच्या मनात राहतील . सतर्क खबरबात जिल्ह्याची कडून राजूभाऊ यांना भावपूर्ण श्रद्धांजली....


Post a Comment

0 Comments