निळवंडेच्या उजव्या कालव्याचे पाणी राहुरी तालुक्यात
राहुरी - विशेष वृत्त
निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याखालील गावांना पाणी सोडण्याच्या राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या आग्रही मागणीनंतर धरणाच्या उजव्या कालव्यात अखेर पाणी सोडण्यात आले.
यापूर्वी तहसीलदार आणि पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता.
पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचून त्याचे योग्य वाटप व्हावे यासाठी मी प्रयत्नशील आहे , पाणी शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्यासाठी काही अडचणी येत होत्या, त्या अडचणींची पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि त्यांना योग्य त्या सूचना केल्या , असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले .
कालव्यापर्यंत पोहोचणारे पाईप देखील आपण पुरवले. या दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. निळवंडे उजव्या कालव्यातून दोन महिन्यापूर्वी पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी झाली होती .
त्यानंतर आज उजव्या कालव्यातून पाणी सोडल्यानंतर ते राहुरी तालुक्यातील निंभेरे , तुळापूर. कानडगाव , तांदुळनेर , वडनेर या भागापर्यंत पोहोचले. येथून बंद पाईप लाईन मधून कालवा केलेला आहे . त्यामुळे तसेच अन्य ओढ्यांपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जातीने लक्ष घातलेले आहे . परिणामी आज तनपुरे यांनी या भागातील कालव्यातून सोडण्यात आलेल्या पाण्याची स्थिती पाहिली .
Post a Comment
0 Comments