राहुरी येथील 'त्या' नेत्यांच्या घरी भरारी पथकाची झाडाझडती
राहुरी विशेष वृत्त
राहुरी येथे लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पैसे वाटल्याच्या तक्रारीवरून रात्री निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने राहुरी येथील विद्यामंदिर परिसरात दाखल होत घराची झाडाझडती घेतली .
यावेळी पोलीस अधिकारी आसिफ शेख , स्थानिक पोलीस व त्यांचे सहकारीही दाखल झालेले होते . या भरारी पथकाने झाडाझडती घेतली , मात्र या झाडाझडतीत काही आक्षेपार्य आढळून आले नसल्याचे खळेकर यांनी माध्यम प्रतिनिधींची बोलताना सांगितले .
महाविकास आघाडीचे कार्यकर्ते धुमाळ यांच्याकडे भरारी पथक आल्याचे समजल्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते स्थानिक आमदार प्राजक्त तनपुरे यांनी धुमाळ यांच्या निवासस्थानी धाव घेतली . अनेक कार्यकर्ते आणि समर्थक यावेळी उपस्थित होते . तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना महायुती सरकारवर आरोप करत म्हटले की , वरून बॉस चा आदेश आल्यानुसार ही कारवाई झालेली दिसत असून हा भाजपकडून रडीचा डाव खेळला जात आहे . धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लोकसभेची लढत असून शासकीय यंत्रणा हाताशी धरल्या जात असल्याचा आरोप तनपुरे यांनी केला . धुमाळ यांच्या घरावरील झाडाझडतीची सर्वत्र चर्चा सुरू होती .
Post a Comment
0 Comments