आ. प्राजक्त तनपुरे यांच्या तालुक्यात भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या सभा नाहीतच
राहुरी - विशेष वृत्त
लोकसभा निवडणुकीसाठी राहुरी तालुक्यात कोणत्याही मोठ्या व राष्ट्रीय नेत्यांच्या सभा होणार नसल्याने जागरूक मतदारांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांपाठोपाठ आता धनंजय मुंडे यांची 8 मे रोजी राहुरी तालुक्यात सभा होणार आहे .
राहुरी तालुक्याला निवडणुका आणि जाहीर , प्रचार सभा काही नव्या नाहीत . दरवर्षी लोकसभा , विधानसभा निवडणुकां व्यतिरिक्त विविध मोठ्या संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने प्रदेश आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते मंडळी नगर जिल्ह्यात येत असल्याने राहुरीशी संबंध त्याच्याशी जोडला जातो . लोकसभा निवडणुकीसाठी नेमका राहुरी तालुक्यातील निम्मा भाग 37 अहमदनगर लोकसभा मतदारसंघाला जोडलेला आहे . राहुरी तालुक्यासह मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे स्टार प्रचारक आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचार दौऱ्यांचा सध्या धडाका सुरू आहे .
यापूर्वी निवडणुकांच्या निमित्ताने नगर जिल्ह्य़ात स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , कै. प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे , उमा भारती. यांच्यासह राजेश खन्ना , राष्ट्रवादीचे नेते शरद पवार , जयंत पाटील , सुप्रियाताई सुळे , अजित पवार यासह अन्य नेत्यांच्या प्रचार सभा ठिकठिकाणी झालेल्या आहेत .
या लोकसभा निवडणुकीत मात्र आठ दिवसांपूर्वीच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सर्वेसर्वा शरद पवारांची मोठी प्रचार सभा झालेली आहे .
नगरला 7 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तर 11 मे ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे . केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची शेवगाव येथे तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 9 मे ला जामखेड , कोपरगाव येथे तर याच दिवशी अजित पवार यांची कर्जत व पारनेर येथे प्रचार सभा होणार आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांची एकमेव सभा राहुरी होणार आहे . त्यामुळे आता 11 मे पर्यंत कोणत्या मोठ्या नेत्यांच्या सभा होणार ! याची चर्चा सुरू असताना केवळ अजित पवार यांच्या पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांची एकमेव सभा राहुरी तालुक्यात होणार असल्याची माहिती समजली आहे . त्यामुळे राहुरी तालुक्यासह मतदारसंघातील जागरूक मतदारांमध्ये याची सध्या चर्चा सुरू आहे .
Post a Comment
0 Comments