Type Here to Get Search Results !

डाव्या कालव्याच्या रोटेशनसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना केला " यांनी "फोन

 डाव्या कालव्याच्या रोटेशनसाठी थेट जिल्हाधिकाऱ्यांना केला आ. तनपुरे यांनी फोन




राहुरी - विशेष वृत्त

         उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने तालुक्यातील शेतीसाठी व पशुधन वाचविण्यासाठी मुळा डाव्या कालव्यातून तात्काळ आवर्तन सोडण्यात यावे या मागणीसाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त झालेल्या लाभधारक शेतक-यांनी तहसील कार्यालयात सुमारे तासभर ठिय्या मांडला .



अधिका-यांशी सकारात्मक चर्चा होऊन उद्यापर्यंत योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन अधिका-यांनी दिले.

      आज सकाळी राहुरी तहसील कार्यालयात आ.तनपुरे यांनी लाभधारक शेतकऱ्यांसह ठिय्या मांडला. पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता विलास पाटील, मुळा डावा कालवा अभियंता अच्चुत गिते, तहसीलदार नामदेव पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरेंसह  यांनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही असा पाविञा लाभधारक शेतक-यांनी घेतला होता . 

अखेर जिल्हाधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी वरून चर्चा करत आज सायंकाळी तात्काळ बैठक आयोजित करून यामध्ये सकारात्मक योग्य ते निर्णय घेऊ असे , आश्वासन भ्रमणध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी आमदार तनपुरे यांना दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात हे आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. मात्र सायंकाळपर्यंत योग्य निर्णय झाला नाही तर उद्या नगर-मनमाड महामार्गावर शेतकऱ्यांसह जनावरांसह रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल असा इशारा आ.तनपुरे यांनी दिला आहे.

         यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे, अमृत धुमाळ, दिलीप इंगळे, सुरेश करपे, किशोर महाराज जाधव, रवींद्र आढाव, प्रकाश भुजाडी, बाळासाहेब खुळे, ज्ञानेश्वर खुळे, उमेश खिलारी, पंडू तात्या पवार, शिवाजी थोरात, बाळासाहेब गाडे, आदिनाथ तनपुरे, प्रभाकर गाडे, सुनिल मोरे, बाळासाहेब गाडे, नवनाथ थोरात, भाऊसाहेब आढाव, संजय पोटे, शहाजी ठाकुर, दत्तात्रय कवाने, नवाब देशमुख, अँड रावसाहेब करपे, सतिश आढाव, अनिल पोटे,आनंद वने,विश्वास पवार,अक्षय वने,धनंजय स॔र्पे आदिंसह लाभधारक शेतकरी मोठ्या संस्थेने उपस्थित होते.

आ.तनपुरेंचा थेट जिल्हाधिका-यांना फोन !

   कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंञ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून नियोजन करून योग्य तो निर्णय घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार आ. प्राजक्त तनपुरे यांनी आता आवर्तन सोडने अंत्यत गरजेचे आहे म्हणून आवर्तन सोडण्याच्या सुचना दिल्या होत्या , त्यानुसार निर्णयही झाला होता. माञ अचानक सदर निर्णय रद्द झाल्याने आमदार तनपुरेंनी यांनी थेट जिल्हाधिका-यांना फोन केला. अन् संतप्त लोकभावना लक्षात घेता आवर्तन सोडणे गरजेचे आहे. हे निर्दशनास आनुन दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तात्काळ बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे तनपुरेंना सांगितले.


Post a Comment

0 Comments