राहुरीचे सराफ मनोज अंबिलवादे यांची वधूवर सूचक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड
राहुरी - विशेष वृत्त
राहुरी शहरातील सराफ , विविध सराफ , सुवर्णकार , कारागीर संघटनेचे मार्गदर्शक मनोज नामदेव अंबिलवादे यांची नूकतीच शंकर महाराज सेवा मंडळ संचलित वधुवर सुचक केंद्र पुणे यांच्या अहमदनगर (अहिल्यानगर ) जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सचिनजी देशमुख यांच्या आदेशानुसार व राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीमती माधुरीताई उदावंत यांच्या शिफारशीनुसार तसेच व्यवस्थापक बी. व्ही. शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली मनोज नामदेव अंबिलवादे यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
या निवडीबद्दल संस्थेच्या वतीने मनोज आंबिलवादे यांचे अभिनंदन करुन आपल्या पदाला योग्य न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच हे कार्य करत असताना यांच्या हातून समाजसेवा घडावी, अशी सदिच्छा संस्थेच्या वतीने देण्यात आल्या .
संस्थेचे पदाधिकारी यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन माझी जिल्हाध्यक्ष पदी निवड केली. मी पदाधिकारी व संस्थेचे आभार व्यक्त करतो. पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मी निस्वार्थपणे तनमन धनाने समाजसेवा करण्यासाठी तसेच समाज कार्य व समाज हित जोपासण्यासाठी मी दिवसरात्र प्रयत्न करीन. असे मनोगत मनोज आंबिलवादे यांनी व्यक्त केले.
मनोज अंबिलवादे यांच्या निवडीबद्दल राहुरी तालूका व अहमदनगर जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना व पदाधिकारी व मित्र परिवाराने मनोज आंबिलवादे यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
Post a Comment
0 Comments