नदीत बुडणाऱ्याचा शोधकार्य करणारी एसडीआरएफची बोट उलटली ; तीन जवानांचा मृत्यू एक बचावला
अकोले - विशेष वृत्त - विलास तुपे यांस कडून
काल बुधवारी प्रवरा नदीत बुडालेल्या युवकाला शोधणाऱ्या एसडीआरएफ ( धुळे ) पथकाची बोट आज उलटून चार जवान बुडाल्याची घटना घडली असून यातील तीन जवानांचा मृत्यू झाल्याचे समजले असून एका जवानाची प्रकृती स्थिर आहे .
काल बुधवारी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे दोन युवक बुडाल्याची घटना घडली होती . त्यातील एकाचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले होते .
प्रशासनाने एस डी आर एफ च्या पथकाला एका बुडालेल्या तरुणाचा शोध घेण्यासाठी सकाळपासून शोधकार्य प्रवरा नदीत सुरू होते . प्रवरा नदीमध्ये सध्या उन्हाळी शेती सिंचनाचे आवर्तन सुरू असल्याने दुथडी भरून वाहत होती . यातच चार जणांच्या पथकाची बोट बुडाल्याने चौघे जवान बुडाले . अन्य जवानांनी व ग्रामस्थांच्या सहकार्याने एका जवानाला वाचवण्यास यश मिळाले . मात्र तीन जवान मृत्यू झाल्याची माहिती समजली आहे . काँग्रेस नेते व संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनीही घटनास्थळी भेट दिली .
वाचवणारे बुडाल्यामुळे या घटनेमुळे जवानांविषयी हळवळ हळहळ व्यक्त होत आहे . गेल्या आठवडाभरापासून ठीक ठिकाणी पाण्यात बुडून अनेक घटना समोर आले असून नागरिक ग्रामस्थांनी काळजी घेण्याची आवश्यकता असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत .
Post a Comment
0 Comments