Type Here to Get Search Results !

आमदार तनपुरे आंदोलनावर ठामच ; तनपुरेंच्या रेट्यामुळे पाटबंधारे खाते झुकले

 आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या रेट्यामुळे पाटबंधारे खाते झुकले ; अखेर डाव्या कालव्यातून पाणी सोडले

आमदार प्राजक्त तनपुरे मात्र आंदोलनावर ठाम असून सकाळी साडेदहा वाजता मार्केट कमिटी समोर शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरण्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे. 



राहुरी - विशेष वृत्त

राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या रेट्यामुळे अखेर पाटबंधारे विभागाला जाग येऊन आज पहाटे मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून 300 क्युसेकने पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले .

राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी गुरुवारी प्रशासनाला रस्त्यावर येण्याचा इशारा दिला होता . जिल्हाधिकाऱ्यांशी त्यांनी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याची जाणीव देखील करून दिली होती .

आज सकाळी कालव्यातून पाणी सोडण्यासाठी रस्त्यावर येण्याचा इशाराही देण्यात आला होता. दरम्यानच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू होत्या. अखेर आज सकाळी मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून पाण्याची आवर्तन सोडण्यात आले . 

पाणी सोडल्याची माहिती समजतात डाव्या कालव्या खालील राहुरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये अक्षरशः जल्लोष करण्यात येत होता . आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या रेट्यामुळे पाणी सोडण्याची वेळ पाटबंधारे खात्यावर आल्याची चर्चा सुरू झाली असून शेतीच्या आवर्तनाला खोडा घालणारे झारीतील शुक्राचार्य कोण ? याची मात्र चर्चा राहुरी तालुक्यात सुरू आहे .

दरम्यान समजलेल्या माहितीनुसार आज प्रशासन आणि जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नगर येथील मुख्यालयात महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे . त्या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे .

Post a Comment

0 Comments